In the car ministry, in the bungalow, the phone is not reachable; Where exactly did Minister Sanjay Rathore go?

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

  औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती आहे.

  या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दी जमल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

  संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे :

  1. संजय राठोड हे सकाळी साधारण ९ वाजता आर्णी-दिग्रस मार्गे पोहरादेवीकडे जाण्यास निघतील.
  2. सकाळी ११.३० वाजता ते पोहरागड येथे पोहचतील.
  3. दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
  4. दुपारी २.३०च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
  5. दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
  6. यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.