बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ इच्छा शिवसेनेने पूर्ण करावी; मनसेची मागणी

औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. शिवसेनेने बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करावी अशी मागणी मनसेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

औरंगाबद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. शिवसेनेने बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करावी अशी मागणी मनसेने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

औरंगाबादच्या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमचा त्यास विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यावरुन चांगलच राजकारण होत आहे. आता, मनसेनं शिवसेनेला संभाजीनगर नावावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आता उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवसेना प्रमुखांची इच्छा पूर्ण करावी. संभाजीनगर हे नामकरण करण्याचा निर्णय कोणाच्याही दबावाला बळी न पडता घ्यावा, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.