
उदय देवळाणकर यांनी छत्रपती शिवरायांची कृषीनिती, बाजारपेठ, कर पध्दती ते आजच्या काळातील पीक पध्दती, बाजापेठ, शेती पूरक व्यवसाय व मार्वेâटिंग आदी बाबींचा उद्यापेह केला. छत्रपती शिवजी महाराज हे स्वराज्याचे जनक तर होतेच परंतु ख-या अर्थाने शेतकरी, कष्टकरी व बारा बलुतेदारांना न्याय देणारे राजे होते.
औरंगाबाद: छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात रयतेसाठी स्वराज्य व शेतक-यांची काळजी घेणारे धोरण राबविले. आजच्या युगातही शिवरायांचे शेतीविषयक धोरण प्रभावीपणे अंमलात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी प्रख्यात शेती तज्ज्ञ उदय देवळानकर (माजी कृषी अधिकारी) यांचे ‘कृषी आधारित उद्योगातील संधी‘ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रकुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, शिवाजी अध्यसनाचे संचालक डॉ.आनंद देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान आदींची उपस्थिती होती. उदय देवळाणकर यांनी छत्रपती शिवरायांची कृषीनिती, बाजारपेठ, कर पध्दती ते आजच्या काळातील पीक पध्दती, बाजापेठ, शेती पूरक व्यवसाय व मार्वेâटिंग आदी बाबींचा उद्यापेह केला. छत्रपती शिवजी महाराज हे स्वराज्याचे जनक तर होतेच परंतु ख-या अर्थाने शेतकरी, कष्टकरी व बारा बलुतेदारांना न्याय देणारे राजे होते, असे अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. डॉ.आनंद देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ विलास अंभुरे यांनी आभार मानले.