धक्कादायक प्रकार, पोटच्या मुलाकडूनच आईची हत्या

पोटच्या मुलाकडूनच आपल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाळपूर गावात घडली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : पोटच्या मुलाकडूनच आपल्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या (Son kill Mother) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील बाळपूर गावात घडली आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असताच, पोलिसांनी या घटनेची चाचपणी केली असता, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीचं नाव रमेश घुगे असं आहे. तसेच शशिकलाबाई घुगे असं मृत आईचे नाव आहे. आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि त्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता. परंतु औरंगाबादच्या या घटनेमुळे येथील गावात हळहळ व्यक्त होत आहे.