Some MLAs in Maharashtra ask questions in Assembly to make money, MIM MLA's sensational allegation

इम्तियाज जलील यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. लोकप्रतीनीधींवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. मात्र, जलील यांनी हा आरोप करत पून्हा एकदा आमदारांच्या खाबुगीरीवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत प्रश्‍न विचारुन अधिकारी व कंत्राटदारांकडून पैसे उकळतात असा आरोप  जलील यांनी केला आहे. ही सत्यस्थिती सर्वांना माहित आहे. पण, मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार! असा प्रश्नही त्यांनी ट्विट करत केला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रतील काही आमदार पैसे उकळण्यासाठी विधानसभेत प्रश्‍न विचारतात असा खळबजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे चर्चेला उधाण आले असून, पैसे उकळणारे आमदार नेमके कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

इम्तियाज जलील यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. लोकप्रतीनीधींवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. मात्र, जलील यांनी हा आरोप करत पून्हा एकदा आमदारांच्या खाबुगीरीवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्रातील काही आमदार हे विधानसभेत प्रश्‍न विचारुन अधिकारी व कंत्राटदारांकडून पैसे उकळतात असा आरोप  जलील यांनी केला आहे. ही सत्यस्थिती सर्वांना माहित आहे. पण, मांजराच्या गळ्यात कोण घंटा बांधणार! असा प्रश्नही त्यांनी ट्विट करत केला आहे.