दोन दिवसांवर मुलाचं लग्न असताना असं काही घडलं की… दारातुन वरात निघण्याआधी आई-वडिलांची अंत्ययात्रा निघाली

मुलाचं लग्न दोन दिवसांवरआले असताना आई वडिलांच्या रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय छानवाल आणि मीना छानवाल असं या दाम्पत्याचं नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला. अपघातानंतर ड्रॉइव्हर आणि क्लिनर  फरार झाले आहेत. खुलताबाद पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

    औरंगाबाद : दोन दिवसांवर मुलाचं लग्न असताना असं काही घडलं की दारातुन वरात निघण्याआधी आई-वडिलांची अंत्ययात्रा निघाली. औरंगाबामध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

    मुलाचं लग्न दोन दिवसांवरआले असताना आई वडिलांच्या रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय छानवाल आणि मीना छानवाल असं या दाम्पत्याचं नाव आहे.

    धुळे सोलापूर महामार्गावर करोडी जवळ हा भीषण अपघात झाला.  भरधाव ट्रक ने दुचाकीला चिरडल्यानंतर या दाम्पत्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला.

    हा अपघात इतका भीषण होता की अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला. अपघातानंतर ड्रॉइव्हर आणि क्लिनर  फरार झाले आहेत. खुलताबाद पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.