शिक्षकच निघतायेत कोरोना पॉझिटिव्ह ; औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १० शिक्षक बाधित

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील व शहरी भागातील शिक्षकांना शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र यास खासगी शाळांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. अद्याप ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या बाकी असताना रविवारी दिवसभरात केवळ २९८ शिक्षकांच्याच कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १० शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करताना शासनाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यासाठी शहरातील १६ कोरोना चाचणी केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पहिल्या दिवशी शहरात १०४४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर दुसर्‍या दिवशी १३९८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातून ६५ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर रविवारी दि.२२ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी दिवसभरात खूपच कमी प्रतिसाद मिळाला. रविवारी केवळ २९८ शिक्षकांनीच कोरोना चाचणी करून घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. यावरून खासगी संस्थाचालकांच्या शाळांतील शिक्षकांकडून कोरोना चाचणीला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. अद्यापही सुमारे ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कोरोना चाचणी केलेली नाही.