राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तालिबानी सरकार, मंदिरे बंद असल्याने भाजपाचा आरोप

“आता आम्ही टाळकरी, नालकरी, वारकरी, साधु, संत यांना एकत्र आणून या मंदिरांचे बंद असलेले दरवाजे उघडणार आहोत. हे रोज सकाळी नोटांचं दर्शन करतात आणि आम्ही देवाचं दर्शन करतो. हा फरत आहे हे सरकार आणि आमच्यात.”

    औरंगाबाद शहरातील गजानन मंदिर परिसरात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय केनेकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे तालिबानी सरकार आहे. त्यामुळे ते आम्हाला घाबरुन पोलिसांना पुढं करत आहेत. सरकारने त्वरित मंदिरं खुली करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा सदरील मंदिरे आम्ही उघडू.” असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.

    “हे सरकार आम्हाला घाबरतं. खरंतर आम्ही मंदिराचे बंद असलेले दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी आमच्यावर दडपशाही केली. या सरकारला श्रावण माहिती नाही, भाद्रपद माहिती नाही. यांना फक्त पैसे मोजणं माहिती. गणपती येतायत, दिवाळी येतेय पण या सरकारला हिंदुंच्या सणांची काही पडलेली नाही. हे हिंदु विरोधी सरकार आहे.”

    “आता आम्ही टाळकरी, नालकरी, वारकरी, साधु, संत यांना एकत्र आणून या मंदिरांचे बंद असलेले दरवाजे उघडणार आहोत. हे रोज सकाळी नोटांचं दर्शन करतात आणि आम्ही देवाचं दर्शन करतो. हा फरत हे सरकार आणि आमच्यात आहे.”

    दरम्यान, एकिकडे तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून धार्मीक सणांमधे आवर घालण्याचे केंद्राने संकेत दिले असताना, आणि राज्य सरकार रात्रींची संचारबंदी करण्याच्य विचारत असताना, दुसरीकडे मात्र मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भाजपचेच नेते केंद्राच्या निर्देशांना हरताळ फासत असल्याचं पाहयला मिळत आहे.