The girl reached the examination center with the help of the police; Appreciated by the Home Minister

औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन सुरू असताना रेल्वे बोर्डाची परीक्षा द्यायला जाणारी विद्यार्थिनी वाहन मिळत नसल्याने गोंधळली होती. मात्र, पोलिस शिपाई हनुमंत चाळनेवाड यांनी तिला स्वतः परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचविले. चाळनेवाड यांच्या या माणुसकीला माझा सलाम ! असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले. या पोलिस कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    औरंगाबाद : महाराष्ट्र पोलिस सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, याचे उदाहरण औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी हनुमंत चाळनेवाड यांनी दाखवून दिले. एका परीक्षार्थीला वेळेत परीक्षा केंद्रावर सोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या पोलिसाचे कौतुक केले आहे.

    औरंगाबादमध्ये शनिवारी लॉकडाऊन असल्याने प्रवासाठी वाहनांची सोय नव्हती. याचवेळी हनुमंत चाळनेवाड या तरुणीच्या मदतीला धावून आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आणि पोलिस कर्मचाऱ्याची पाठ थोपाटली.