The historic BBK tomb area will be beautified under the Smart City scheme; Municipal Commissioner and Administrator Astik Kumar Pandey inspected the work

स्मार्ट सिटी योजना अंतर्गत बीबी का मकबरा परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यात येणार आहे .या कामाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज बीबीका मकबरा ला भेट देऊन परिसराची व औरंगाबाद लेणी कडे जाणाऱ्या रस्त्याचीही पाहणी केली. बीबीका मकबरा समोरील गार्डन व मकबरा आतील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

    औरंगाबाद : ऐतिहासिक बीबीका मकबरा व परिसराचे स्मार्ट सिटी योजनांतर्गत सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आज गुरुवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भेट देऊन बीबीका मकबरा व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी भारतीय पुरातत्व खात्याचे बीबीका मकबरा व्यवस्थापक गिरी यांच्याशी चर्चा केली.

    स्मार्ट सिटी योजना अंतर्गत बीबी का मकबरा परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यात येणार आहे .या कामाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज बीबीका मकबरा ला भेट देऊन परिसराची व औरंगाबाद लेणी कडे जाणाऱ्या रस्त्याचीही पाहणी केली. बीबीका मकबरा समोरील गार्डन व मकबरा आतील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

    यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, शहर अभियंता एस. डी.पानझडे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त नंदकिशोर भोंबें,विद्युत कार्यकारी अभियंता देशमुख, नगर रचनाकार जयंत खरवडकर,स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर स्नेहा बक्षी व स्नेहा नायर आदी उपस्थित होते.