पतीने कौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंबालाच संपविले; स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या

पत्नीची आणि आपल्या 16 वर्षीय मुलीची हत्या (killing) करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या (suicide by hanging) केली आहे. ही धक्कादायक घटना (The shocking incident) अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील (in Daryapur taluka of Amravati) भामोद या गावात उघडकीस आली आहे.

    अमरावती (Amravati). पत्नीची आणि आपल्या 16 वर्षीय मुलीची हत्या (killing) करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या (suicide by hanging) केली आहे. ही धक्कादायक घटना (The shocking incident) अमरावतीच्या दर्यापुर तालुक्यातील (in Daryapur taluka of Amravati) भामोद या गावात उघडकीस आली आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन (Yevda police station) अंतर्गत हा प्रकार घडला आहे. भामोद येथे एका इसमाने पत्नी व १६ वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख वय (४५) याने आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

    पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला. कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला. याच वेळी घरातील मागच्या एका खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.