औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा १८ हजार पार

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ४१० झाली आहे. यातील ४ हजार ३६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १३ हजार ४७४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच ५७६ कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिवसेंदविस वाढणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंताजनक आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात औरंगाबाद जिल्ह्यात १५१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ४१० झाली आहे. यातील ४ हजार ३६० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १३ हजार ४७४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच ५७६ कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.