औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांचा आकडा २५ हजारांच्या पार

मिळालेल्या माहितीनुसार, आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ८४ , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ आणि ग्रामीण भागात ६७ रुग्ण आढळलेल आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ हजार २३१ इतकी झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात ३४२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून १० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे औरंगाबदमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २५ हजारांच्या पार गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ८४ , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ आणि ग्रामीण भागात ६७ रुग्ण आढळलेल आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ हजार २३१ इतकी झाली आहे.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे ७४१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे १९ हजार ४०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.