धावत्या चारचाकीने पेट घेतला ; अन् ….

चारचाकीला आग लागण्याची घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक अचानक या धावत्या कार पेट घेतला.

    औरंगाबाद (Aurangabad).  चारचाकीला आग लागण्याची घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अचानक अचानक या धावत्या कार पेट घेतला आणि वाहनचालकाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली; मात्र कार जळून खाक झाली.

    या घटनेमुळे थोड्या प्रमाणात औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या आणि रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आणि वाहतूक कोंडीही सुरळीत करण्यात आली.

    शहरात या आधीही अशा घटना बऱ्याच वेळा पाहायला मिळालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका रुग्णवाहिकेला आग लागून त्यामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती.