औरंगाबाद मनपा
औरंगाबाद मनपा

पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकने लॉकडाऊनचे संकेत दिले असतानाच. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होईल. यामुळे बी अ‍ॅलर्ट, कामाला लागा असा सावधगिरीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

    औरंगाबाद: पून्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकने लॉकडाऊनचे संकेत दिले असतानाच. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मराठवाड्यात कोरोनाचा केव्हाही उद्रेक होईल. यामुळे बी अ‍ॅलर्ट, कामाला लागा असा सावधगिरीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

    ही ऑडिओ क्लिप ११ मिनिटं १९ सेकंदाची आहे. सुनील केंद्रेकर यांनी मराठावाड्यातील पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना अ‍ॅलर्ट राहा, कोरोना रोखण्यासाठी कामाला लागा, असे आदेशच दिले आहेत. बीड, नांदेड आणि लातूरबाबत त्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे.

    या क्लिपमध्ये केंद्रेकर याचा एकतर्फी संवाद ऐकायला मिळत आहे. खबरदारीच्या अनुषंगाने ते अधिकाऱ्यांना सूचना देताना दिसत आहेत.
    मंगल कार्यालयांना नोटिसा पाठवा. बिना मास्कचे आणि मर्यादीत संख्यापेक्षा जास्त गर्दी असणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करा. अशी मंगल कार्यालये सीलच करा असे आदेश त्यांनी दिले आहेत. कोचिंग क्लासेमध्ये मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंसींग आदी नियमांचे पालन होते की नाही ते तपासा. कोविड टेस्ट बंधनकारक करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन लावावा लागेल अशा इशाराही त्यांनी दिलाय.