कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शेकडो ठिकाणी हजारो नागरीकांनी घेतली प्रतिज्ञा

कोविड-१९ या  (Covid 19) महामारीच्या संसर्गाशी संपूर्ण मानव लढत असतांना या कोरोना विषाणूपासून महाराष्ट्रातील जनतेला बाधा होण्यापासून रोखण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शासन तुमची जबाबदारी घेत असून स्वत:ची जबाबदारी या नात्याने 'माझे कुटूंब माझी जबाबदरी' हि मोहीम राबवित आहेत.

औरंगाबाद :  कोविड-१९ या  (Covid 19) महामारीच्या संसर्गाशी संपूर्ण मानव लढत असतांना या कोरोना विषाणूपासून महाराष्ट्रातील जनतेला बाधा होण्यापासून रोखण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शासन तुमची जबाबदारी घेत असून स्वत:ची जबाबदारी या नात्याने ‘माझे कुटूंब माझी जबाबदरी’ हि मोहीम राबवित आहेत.यात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी औरंगाबाद माझे कुटूंब माझी जबाबदरी हि मोहीमेची २ ऑक्टोबरपासून (2 October) सुरुवात केली असुन जिल्ह्यात शेकडो ठिकाणी हजारो नागरीकांनी वार्डावार्डात गाव पातळीवर कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्याची प्रतिज्ञा घेतली.

याची सुरुवात आमदार अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,यांनी औंगाबाद पुर्व विभागत एन-७ सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवेनरी कॉलनी या ठिकाणी शिवसेना शाखेच्या नागरीकांना,शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या समवेत प्रतिज्ञा घेतली तर कन्नड तालुक्यात नागद येथे आ.उदयसिंह राजपुत,कन्नड शहरात उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे,तालुकाप्रमुख केतन काजे,रत्नपुर येथे तालुकाप्रमुख राजु वरकड यांनी मावसाळा येथे गंगापुर येथे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे,अविनाष पाटील,उपाध्यक्ष मंगला राजपुत,भागेश गंगवाल,आबा शिरसाट,प्रकाश जैस्वाल,लासुरस्टेशन येथे तालुकाप्रमुख दिनेश मुथा,वैजापुर शहर येथे उपनगराध्यक्ष साबेर शेख,विरगाव येथे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप,संभाजीनगर पश्चिम कोकणवाडी येथे शहरप्रमुख विजय वाघचौरे,सभागृह नेते विकास जैन,उपशहरप्रमुख संजय बारवाल,बजाजनगर येथे तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे,बबन सुपेकर,कृष्णा राठोड,अशोक लगड,ग्रामपंचायत येथे सरपंच सचिन गरड,उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी,ग्रांमपंचायत सदस्य सुनिल काळे,महेश भोडंवे यांच्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेतली