shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

  औरंगाबाद: मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना औरंगाबाद शाखेच्या ३६ वा वर्धापन दिन ८ जून रोजी सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

  मंगळवार, ८ जून रोजी सकाळी ९ वाजता गुलमंडी येथे दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण होणार आहे. तसेच सॅनिटायझर, मास्क आणि आरोग्य साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता परंपरेप्रमाणे सत्यनारायण महापूजा होईल.

  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ऑनलाईन संवाद साधणार आहे. तसेच ७ वाजता भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  बुधवारपासून ग्रामीण भागात पंचायत समिती गण व जिल्हापरिषद गट तर शहरात वॉर्डनिहाय शिव जनसंपर्क मोहिम राबविण्यात येणार आहे.

  शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना नेते, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमास रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, संपर्कसंघटक आमदार मनीषा कायंदे, सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार आर. एम. वाणी, किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर तथा युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, सहसंर्पक संघटक कला ओझा, सहसंपर्क सुनीता आऊलवार, शिवअंगणवाडी सेनेच्या रंजना कुलकर्णी,  जिल्हासंघटक सुनीता देव, राखी परदेशी, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, राजेंद्र राठोड, बंडू ओक, गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे आदींसह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभा संघटक, शहरप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत आघाडी आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहे.

  यावेळी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी कोरोनाच्या नियमाचा पालन करणे अनिवार्य केले आहे. मास्क, सॅनिटायझर व अंतर पाळून सर्व कार्यक्रम पार पडणार आहे.

  हे सुद्धा वाचा