औरंगाबादच्या शाळेत वाजली धोक्याची घंटा; दोन शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यातच शाळेतील २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

औरंगाबाद : गेल्या वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus) राज्यातील शाळा बंद होत्या. गेल्या काही दिवसांपासून परिस्थितीत पूर्ववत होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यातच शाळेतील २ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

पहिल्याच दिवशी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा नेमका आकडा लवकर जाहीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आता ९ वी व१० वीची शाळा सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने शाळेतील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.

डिसेंबर २८ ते ३ जानेवारीपर्यंत१३५९ शिक्षण आणि कर्मचाऱ्यांची चाचणी (RT-PCR tests) करण्यात आली आहे. दोन शिक्षक आणि १ कर्मचाऱ्याला आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.