Vaccination for the disabled in Aurangabad for the first time in Maharashtra

महाराष्ट्रात प्रथमच महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 18 ते 44 वयोगटातील मतीमंद व दिव्यांग नागरिकांसाठी लहुजी साळवे आरोग्य केंद्र, मिलिंद नगर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आज सोमवार पासून राबविण्यात सुरुवात करण्यात आली. आमदार संजय शिरसाठ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय,माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत या मोहीमेची सुरूवातीला करण्यात आली.

    औरंगाबाद: महाराष्ट्रात प्रथमच महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 18 ते 44 वयोगटातील मतीमंद व दिव्यांग नागरिकांसाठी लहुजी साळवे आरोग्य केंद्र, मिलिंद नगर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आज सोमवार पासून राबविण्यात सुरुवात करण्यात आली. आमदार संजय शिरसाठ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय,माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत या मोहीमेची सुरूवातीला करण्यात आली.

    समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ हे राष्ट्रीय सेवा भावी संस्था दिव्यागांच्या विकासासाठी काम करते. या संस्थेतर्फे आज सोमवारी 18 ते 44 वयोगटातील दिव्यांग नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सक्षम औरंगाबाद आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या लहुजी साळवे आरोग्य केंद्र मिलिंद नगर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली.

    या लसीकरणासाठी विहंग शाळा, नवजीवन शाळा, स्वयंसिद्ध शाळा आदींनी सहभाग नोंदवला. या मोहिमेचा शुभारंभ आमदार संजय शिरसाठ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर उपस्थित होत्या.

    या मोहिमेच्या पहिल्या दिवशी 90 दिव्यांग नागरिकांनी लसीकरण साठी नोंद केली व 50 दिव्यांगाना लस देण्यात आली. विशेष म्हणजे आणखी दिव्यांगाचा डाटा जमा करून त्यांचेही लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील ही पहिलीच लसीकरण मोहीम औरंगाबाद राबवण्यात आली आहे. या मोहिमेचा शहरातील दिव्यांग व मतिमंद विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर नीता पाडळकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनपा उपायुक्त अपर्णा थेठे, अदिती शार्दूल, प्रशांत सोमवंशी,अभिजित जोशी आणि तृष्णा माली ने परिश्रम घेतले.