shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    20 मे 2018 रोजी औरंगाबादमध्ये दंगली झाल्यानंतर जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तोडफोड तसेच पोलिसांना शिवीगाळ केली होती. औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन कार्यकर्त्यांना सोडण्याची आमदार जैस्वाल यांनी मागणी केली होती.

    त्यांनी शहरातील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात जाऊन खुर्च्या तसेच काचांची तोडफोड केली होती. तसेच पोलिसांना शिवीगाळसुद्धा केली होती. याच आरोपाप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत पोटे यांनी त्यावेळी फिर्याद दिली होती.

    हे सुद्धा वाचा