‘विलासराव म्हणाले होते, हा अतिशय चालू पुरजा’; नाना पटोलेंनी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची उडवली खिल्ली

‘ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आणि निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हा त्यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी मी स्वतः आणि आमदार कैलास गोरंट्याल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटलो. तो अतिशय चालू पूरजा असल्याचे देशमुख यांनी आम्हाला त्यावेळी सांगितले होते’. या शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

    औरंगाबाद : ‘ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आणि निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हा त्यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी मी स्वतः आणि आमदार कैलास गोरंट्याल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटलो. तो अतिशय चालू पूरजा असल्याचे देशमुख यांनी आम्हाला त्यावेळी सांगितले होते’. या शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

    दरम्यान ग्रामीण भागात सुरू असलेल्या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी औरंगाबाद शहराला भेट देत कार्यकर्ता मेळावा, व्यर्थ न हो बलिदान हा कार्यक्रम तसेच पत्रकार परिषद यामध्ये काँग्रेसचे विविध धोरणांबद्दल माहिती दिली. त्याबरोबरच तत्कालीन सरकारवर टीका करत केंद्राच्या अनेक धोरणांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ग्रामीण भागातही पटोले यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

    मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला

    यावेळी बोलताना ते म्हणाले, आरक्षणाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा अभ्यास थोडा कमी पडत आहे. १०२ वी घटना दुरुस्ती कशासाठी केली होती हे रावसाहेबांनी सांगावे. भाजपवर टीका करताना ते म्हणाले ५० टक्के आरक्षण मर्यादा उठवण्याचा ठराव मी स्वतः विधानसभेत सभापती असताना पारित केला होता. मग १२७ व्या घटना दुरुस्ती मध्ये समावेश का केला नाही, हे दानवेंनी सांगावे. भाजप हे आधीपासूनच आरक्षण विरोधी आहे. भाजपचे मूळ महासंघ आहे. आणि त्याचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळे आरक्षणाबद्दल बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. जालना येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले.

    तसेचं परतूर-मंठा विधानसभा जिल्हा जालना येथे कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी बंजारा समाजातील संघटना कॉंग्रेस मध्ये विलीन करण्यात आली. व बंजारा समाजातील नेत्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.बंजारा समाजातील महिला-पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा, नृत्य सादर करुन पटोले यांचे स्वागत केले.