imtiyaz jaleel

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आमचा सुप्रीम कोर्ट, सीबीआय, पार्लमेंट आणि लोकसभेवर विश्वास आहे. परंतु याच संस्था आता फसवणूक आणि धोका देत असतील तर सामान्या माणसाने कोणाकडे न्याय मागायचा, त्यामुळे आता काळजी करण्याची वेळी आली आहे.

औरंगाबाद : उत्तरप्रदेशमधील हाथरस (Hathras case) येथे झालेल्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. औरंगाबादमध्ये एमआयएमच्या (MIM) वतीने उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पिडितेला श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी औरंगाबाद चौकात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांनी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याच्यासोबत एमआयएम खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil) उपस्थित आहे.

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आमचा सुप्रीम कोर्ट, सीबीआय, पार्लमेंट आणि लोकसभेवर विश्वास आहे. परंतु याच संस्था आता फसवणूक आणि धोका देत असतील तर सामान्या माणसाने कोणाकडे न्याय मागायचा, त्यामुळे आता काळजी करण्याची वेळी आली आहे. पिडितेच्या घरच्यांना बंदी करुन ठेवले आहे. त्यांना भेटण्याची कोणालाही परवानगी दिली जात नाही आहे. हे धक्कादायक आहे. तसेच गुंडाराज आहे. असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरु आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. परंतु भाजपाचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर का उतरत नाही आहेत. त्यांच्या घरी आई, मुली, बहिणी नाहीत का? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. देशात गुंडाराज पसरला आहे. राहुल गांधींच्या कॉलरपर्यंत हात जात आहे. म्हणजे हा पोलिसांनी केलेला नंगा नाच आहे. योगी अदित्यनाथ यांना बाहेर काढले पाहिजे असे मतही खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.