तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच लोकांच्या जीवाशी खेळू नका; राजकीय नेत्यांना कोर्टाने बजावले

पीएम केअर्स फंडातून मराठवाड्याला मिळालेल्या खराब व्हेंटिलेटर्स प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले. व्हेंटीलेटर्सच्या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात खंडपीठाने राजकीय नेत्यांना बजावले.

    औरंगाबाद : पीएम केअर्स फंडातून मराठवाड्याला मिळालेल्या खराब व्हेंटिलेटर्स प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले. व्हेंटीलेटर्सच्या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच लोकांच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दात खंडपीठाने राजकीय नेत्यांना बजावले.

    काही राजकारण्यांनी रुग्णालयाला भेट देऊन व्हेंटिलेटरची तपासणी अशा प्रकारे केली की त्यांना यासंदर्भातील ज्ञान आहे. त्यांनी व्हेंटिलेटरमध्ये सुधारणा करण्याची देखील शिफारस केली, असे खंडपीठाने सांगितले. राजकीय नेते यातील तज्ज्ञ नाहीत. यामुळे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नये आणि रुग्णालयांना भेटी देण्याचे टाळावे, असे आवाहन न्यायालयाने यावेळी केले.

    दरम्यान, कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र त्यापैकी काही व्हेंटिलेटर हे दुरुस्ती पलीकडे गेल्याचे समोर आले आहे. मुंबई हायकोर्टाने पीएम केअर फंडाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये देण्यात आलेल्या खराब व्हेंटिलेटरची आता गंभीर दखल घेत केंद्र सरकारला याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे.