युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात ‘विश्वासघात आंदोलन’

पेट्रोलच्या किमती ने शंभरी गाठल्याने या वेळी उपहासात्मक दर-शतक साजरे करण्यात आले या साठी काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक सेंचुरी सेलिब्रेशन करत केंद्र सरकारचा निषेध केला कार्यक्रमाचे नेतृत्व शहर युवक कांग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठान यांनी केले.

    औरंगाबाद : सातत्त्याने होत असलेल्या पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस च्या दरवाढी विरोधात व केंद्र सरकारच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने क्रांतिचौक पेट्रोलपंप पंपावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. या वेळी केंद्रातील भाजपा च्या मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. सबके साथ विश्वासघात ! अब की बार बूरे फसे यार ! झुठे वादे ! झुठी सरकार ! हम दो हमारे दो ङिझेल ९० पेट्रोल १००!भाजपा सरकार मुर्दाबाद ! अशा घोषणा देण्यात आल्या.

    पेट्रोलच्या किमती ने शंभरी गाठल्याने या वेळी उपहासात्मक दर-शतक साजरे करण्यात आले या साठी काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक सेंचुरी सेलिब्रेशन करत केंद्र सरकारचा निषेध केला कार्यक्रमाचे नेतृत्व शहर युवक कांग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठान यांनी केले.

    या प्रसंगी शहर जिल्हा युवक कांग्रेसचे अध्यक्ष मुजफ्फरखान पठान,शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलीम, सचिव अकील पटेल,अनुराग शिंदे,निलेश अंबेवाडीकर, अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अथर, हमद चाऊश,सरोज मसलगे,लियाकत पठान,जैस्वाल,मोहसीन खान,मुजाहेद पटेल,शफीक सरकार, अरूण शिरसाट,सलीम खान,नदिम सौदागर,योगेश बहादुरे,मयूर साठे,आकाश रगङे,सचिन सकट, राजु देहाङे,गुरमीत गिल,सय्यद फयाजोद्दीन,विजय कांबळेआदि उपस्थित होते.