ऑटो

Electric Car, Bike and Scooterदोन वर्षांनंतर इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त! पेट्रोल-डिझेलच्या वाहनांप्रमाणे होणार किंमती; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास
इलेक्ट्रिक कारची विक्री वाढावी, यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. फेम योजनेंतर्गत या वाहनांना सबसिडीही देण्यात येते आहे. ही सबिसिडी देऊनही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती, पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांपेक्षा जास्त आहेत. अशा स्थितीत केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, येत्या दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांइतक्या खाली उतरतील (Electric vehicles will be cheaper after two years, Union Minister Nitin Gadkari expressed confidence).