Tweeted by @peakfm929
Tweeted by @peakfm929

आजवर या वाहनाचे फक्त उडणारे व्हर्जनच पायलट आणि फ्लाईंग स्कूलसाठी उपलब्ध आहे. याचे रस्त्यावर चालणारे व्हर्जन मार्केटमध्ये येण्यासाठी अजूनही जवळपास वर्षभरचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : उड्डाण करणाऱ्या (Flying Car) चं स्वप्न वास्तवात येण्यासाठी एक पाऊल आणखीन जवळ आले आहे. फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन (Federal Aviation Administration) ने हाइब्रिड ग्राऊंड-एअर व्हेईकल (Hybrid Ground-Air Vehicle) ला मंजुरी दिली आहे, जी १०० मैल प्रतितास या वेगाने उड्डाण करते.

    टेराफुगिया ट्रांसिशन (Terrafugia Transition) ने एजन्सीकडून एक विशेष लाइट-स्पोर्ट एअरक्राफ्ट एअरवर्थनेस प्रमाणपत्र प्रमाणपत्र (Special Light-Sport Aircraft Airworthiness Certificate) प्राप्त केले आहे, म्हणजेच या कारला उड्डाणासाठीची परवानगी मिळाली आहे.

    तथापि, आजवर या वाहनाचे फक्त उडणारे व्हर्जनच पायलट आणि फ्लाईंग स्कूलसाठी उपलब्ध आहे. याचे रस्त्यावर चालणारे व्हर्जन मार्केटमध्ये येण्यासाठी अजूनही जवळपास वर्षभरचा अवधी लागण्याची शक्यता आहे. या वाहनाला अद्यापही रस्ते सुरक्षा मानकांच्या दृष्टीने प्रमाणपत्र मिळालेले नाही.

    वैशिष्ट्ये

    100-hp रोटॅक्स 912iS स्पोर्ट फ्यूल-इंजेक्टेड इंजन द्वारे संचालित हे वाहन, 100 मिली प्रतितास वेगाने जवळपास 644 किमीच्या परिघात 10,000 फूट ऊंचीवरून उड्डाण करण्यास सक्षम आहे.

    उपलब्ध माहितीनुसार, टेराफुगिया ट्रांसिशनचे वजन अंदाजे 590 किलोग्रॅम आहे आणि यात फिक्स्ड लँडिंग गिअर दिला आहे. तर याचे पंख 27 फूट रुंद आहेत. सोबतच या वाहनाचे पंख आकुंचन पावल्यानंतर सहजच एखाद्या सर्वसामान्य कारप्रमाणेच ते पार्कही करता येऊ शकते.

    काय असेल किंमत

    न्यूज रिपोर्ट्सनुसार ट्रांजिशनचे 2-सीटर मॉडेलची किंमत जवळपास 2 कोटी 91 लाख रुपये होती. पण, आता वर्ष 2022 मध्ये कंपनीने आपली हाइब्रिड ग्राऊंड-एअर व्हेईकल लाँच केल्यानंतरच याचा किंमतीबाबतचा खुलासा होऊ शकेल.