audi q8 celebration edition launched in india
भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त Audi Q8 कार, जाणून घ्या फीचर्स…

Audi India ने हिंदुस्थानात आपली सर्वात स्वस्त Audi Q8 Celebration Edition लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला याच कारच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत.

  • स्टँडर्ड व्हेरियंटपेक्षा 34 लाख ₹ नी स्वस्त

Audi India ने हिंदुस्थानात आपली सर्वात स्वस्त Audi Q8 Celebration Edition लाँच केली आहे. आम्ही तुम्हाला याच कारच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन

Audi Q8 Celebration Edition मध्ये 3.0 लिटरचे TFSI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 335 bhp ची पॉवर आणि 500 Nm चा टॉर्क निर्माण करते. ही कार 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास गती प्राप्त करते. हिचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

फीचर्स

Audi Q8 Celebration edition यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स, हॅप्टिप रिस्पॉन्ससह ड्युअल टचस्क्रीन, एमएमआय नेव्हिगेशन, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस आणि ऑडी प्री-सेन्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

Audi Q8 Celebration Edition ची एक्स-शोरूम किंमत 98.98 लाख ₹ आहे. ही किंमत Audi Q8 च्या स्टँडर्ड व्हेरियंटपेक्षा 34 लाख ₹नी स्वस्त आहे.