कार धुताना ‘या’ चुका टाळाच अन्यथा तिचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे

पाण्याने कार धुताना रंग उडण्याची शक्यता असते. कार धुण्यासाठी तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे, ते सर्व गाडीच्या जवळ आणून ठेवा. पाण्याची बादली, गाडी धुण्यासाठीचा साबण आणि एखादे छोटे कोरडे फडकेआणि पाण्याच्या पाइपची आवश्यकता असेल, तर तो पाइप अशा पद्धतीचे सर्वच साहित्य जमवण्यासाठी प्रत्यक्ष कार धुताना धावाधाव करू नका.

    आपली कार स्वच्छ असावी असे प्रत्येकालाच वाटत असते. कार धुणे एक मोठे काम आहे. यातच वेळ नसल्यामुळे कार धुण्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. थोडी पूर्वतयारी व वेळ याचबरोबर कार धुताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. तुम्ही कार धुण्यापूर्वी ती बराच वेळ उन्हात ठेवलेली नाही ना, याची खात्री करा.

    अन्यथा, पाण्याने कार धुताना रंग उडण्याची शक्यता असते. कार धुण्यासाठी तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे, ते सर्व गाडीच्या जवळ आणून ठेवा. पाण्याची बादली, गाडी धुण्यासाठीचा साबण आणि एखादे छोटे कोरडे फडकेआणि पाण्याच्या पाइपची आवश्यकता असेल, तर तो पाइप अशा पद्धतीचे सर्वच साहित्य जमवण्यासाठी प्रत्यक्ष कार धुताना धावाधाव करू नका. त्यामुळे प्रत्यक्षात कार धुतानाचा तुमचा वेळ उगाचच वाढेल.

    जो साबण तुम्ही गाडी धुण्यासाठी वापरणार आहात, तो आधीच बादलीतील पाण्यात ओतून नीट घुसळून घ्या. म्हणजे गाडी धुताना चांगला फेस येईल आणि गाडीही व्यवस्थित स्वच्छ होईल. एक साबणाच्या पाण्याने भरलेली बादली आणि दुसरी साध्या पाण्याची बादली अशा दोन्ही बादल्या जवळ बाळगा.

    शक्यतो गाडी पाइपने धुवू नका. त्यामुळे पाण्याचीही बचत होते आणि गाडीचा रंग उडणार नाही किंवा पाण्याच्या जोराने काही धक्का लागणार नाही, अशा पद्धतीचा पाइपमधल्या पाण्याचा जोर किती असावा, याची कल्पना जितकी कार वॉशिंग करणाऱ्यांना असते, तितकी ती आपल्याला नसते. त्यामुळे पाईपचा वापर शक्यतो टाळाच.