ड्रायव्हिंग करत असताना गुगल मॅपचा वापर टाळा तरीही ‘असं’ केल्यास वाचणार ५ हजार रुपये; जाणून घ्या सविस्तर

बदलत्या काळानुसार मोबाइल ॲप्सचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जर तुम्हीही Google Map चा वापर ड्रायव्हिंग करताना करत असाल तर वाहतुकीच्या नियमानुसार (Traffic Rules) तुमचे ५ हजार रुपयांपर्यंतचे चालान (Challan) कापले जाऊ शकते.

    दिल्ली : आजच्या काळात एखाद्याला पत्ता विचारण्याऐवजी नेव्हिगेशन (Navigation)च्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याला नागरिक अधिकाधिक पंसती देतात. हेच प्रमुख कारण आहे की, यंदाच्या दिवसांमध्ये Google Mapचा वापर वाढला आहे. पण जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना हातात मोबाइल घेऊन जर गुगल मॅपचा वापर करत असाल तर याचा परिणाम तुमच्या खिशावर होण्याची दाट शक्यता आहे.

    कापले जाऊ शकते ५ हजार रुपयांपर्यंतचे चालान

    सर्वसाधारणपणे लोकं ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप (Google Map )च्या नेव्हिगेशन (Navigation) ऑन करतात. याच्या माध्यमातून आपल्याला रुटची माहिती मिळते, आणि जर एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम असेल तर याची आपल्याला आगाऊ माहिती मिळते. तुमच्याकडे वेळ असल्यास तुम्ही दुसऱ्या रस्त्याचा वापर करू शकता.

    हे सर्व गुगल मॅपचे फायदे आहेत पण काही नुकसानही आहे. तुम्ही जर तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर मोबाइल होल्डर लावला नसेल आणि हातात मोबाइल फोन घेऊन गुगल मॅपचा वापर करत असाल तर ५ हजार रुपयांपर्यंत चालान कापण्याची कायद्यात तरतूद आहे.

    मोटार वाहन कायद्यात आहे चालान कापण्याची तरतूद

    अलीकडेच दिल्लीत एका व्यक्तीचे पोलिसांनी चालान कापले होते. कार चालकाने असा युक्तीवाद केला की, मी कोणाशीही फोनवर बोलत नव्हतो तरी माझं चालान का कापलं. मोबाइल होल्डर ऐवजी डॅशबोर्ड किंवा हातात मोबाइल धरून गुगल मॅपचा वापर करणे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे कारण असं केल्यास ड्रायव्हिंग करताना लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. हे प्रकरण निष्काळजीपणाने वाहन चालवण्याच्या प्रकारात येते.

    मोबाइल होल्डरचा वापर करा

    जर तुम्ही ड्रायव्हिंद दरम्यान गुगल मॅपचा वापर करत असाल तर यासाठी आपल्या वाहनात मोबाइल होल्डर बसवून घ्या. मोबाइल होल्डरमध्ये फोन लावून गुगल मॅपचा वापर केल्यास कायद्याने नियमाचे उल्लघंन होत नाही. मोबाईल होल्डर बाइकमध्ये लावायचा असल्यास २०० रुपयांपर्यंत आणि कारमध्ये १ हजार रुपयांपर्यंत लावता येईल. जर तुमच्याकडे वेळ असल्यास मोबाइल होल्डर बसवल्यास १ हजार रुपये खर्च करून ५ हजार रुपयांचे चालान काटण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो.