‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे वाईट बातमी;  कर्मचारी कपात करणार असल्याने बेकारांच्या संख्येत पडणार आहे भर

यामध्ये, संस्थात्मक समीक्षेमुळे ताशी वेतन आणि उत्पादन कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. टाटा मोटर्स ऑफ इंडियाच्या मालकीच्या जेएलआरने याआधीच सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत 2024 पर्यंत त्यांचा लँड रोव्हर ब्रँड पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि ईव्हीस लाँच करण्यास सुरुवात करेल.

    नवी दिल्ली : कोरोना काळात आधीच अनेक कंपन्यांनी नोकर कपात केल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याच काळात अनेकांच्या पगारात देखील कपात करण्यात आली होती यानंतर आता प्रसिद्ध कार कंपनी जग्वार लँड रोव्हर(जेएलआर) आपल्या कर्मचारी संख्येत कपात करणार असून, एकूण 2 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार असल्याचे कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे.

    यामध्ये, संस्थात्मक समीक्षेमुळे ताशी वेतन आणि उत्पादन कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. टाटा मोटर्स ऑफ इंडियाच्या मालकीच्या जेएलआरने याआधीच सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत 2024 पर्यंत त्यांचा लँड रोव्हर ब्रँड पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि ईव्हीस लाँच करण्यास सुरुवात करेल.

    तसेच कंपनीने दुसरीकडे लग्झरी जग्वार ब्रँडची घोषणाही केली आहे. कंपनीच्या सर्व गाड्या 2025 पर्यंत इलेक्ट्रिक होणार असून, 2030 पर्यंत सर्व ई-मॉडेल लाँच केले जातील, असे जग्वारने स्पष्ट केले आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या सर्व कामकाजाचा आढावा घेत असून पुढील आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये कंपनी जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीत कपात करणार असल्याचे कंपनीने एका मेलमध्ये म्हटले आहे.