बजाज ऑटो ने ‘एक्स्ट्रा कडक’ वैशिष्ट्यांसह नवीन CT110X लाँच केली; जाणून घ्या वैशिष्ट्ये

जाड क्रॅश गार्ड आणि मोल्डेड फूटहोल्ड्स तसेच वाहन चालवताना सुरक्षा आणि आरामाचा विचार केला आहे. मोटरसायकलमध्ये रियर कॅरियरची सोय आहे. सुमारे 7 किलोचे वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.

  • वेगवान 110-सीसी इंजिनासोबत ग्राहक-केंद्री वैशिष्ट्यांसह नवीन CT110X ‘एक्स्ट्रा कडक’ रुबाब, कामगिरी आणि तगडी बांधणी
  • CT110X ही सीटी पोर्टफोलियोतील सर्वोत्तम वेरियंट मानले जाते, तिची टाकी विस्तृत असून जाड क्रश गार्ड, चाईल्ड फूटहोल्ड, ड्युएल टेक्स्चर आणि ड्युएल स्टीच्ड प्रीमियम सीट
  • हिची किंमत रु. 55,494 (एक्स शोरूम – दिल्ली) असून चार रंगांत उपलब्ध

नवी दिल्ली : बजाज ऑटो – हा जगाच्या पसंतीचा भारतीय असून या कंपनीने देशात नवीन CT110X लाँच केली. ही नवीन CT110X सिटी पोर्टफोलियोमधील सर्वोत्तम वेरियंट असून ‘एक्स्ट्रा कडक’ रुबाब, कामगिरी आणि तगड्या बांधणीने युक्त आहे. रस्त्यावर वाहन चालविण्याची आव्हाने लक्षात घेऊन हिचे डिझाईन तयार केले आहे. हिच्या विस्तृत क्रॉस-सेक्शन सोबतच रांगडा आणि दणकट रुबाब, सोबतच लक्षवेधी हेडलाईट आणि संपूर्ण काळा वायझर असलेली CT110X या सेगमेंटमधील स्पर्धेत काहीतरी अतिरिक्त देऊ करते.

आम्ही ग्राहक आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक बदल केले आहेत. जाड क्रॅश गार्ड आणि मोल्डेड फूटहोल्ड्स तसेच वाहन चालवताना सुरक्षा आणि आरामाचा विचार केला आहे. मोटरसायकलमध्ये रियर कॅरियरची सोय आहे. सुमारे 7 किलोचे वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. वाहन चालवण्याचा आराम आणखी वाढविण्याच्या हेतूने सीटला ड्युएल-टेक्चर आणि ड्युएल स्टीच फिनिश देण्यात आले. हिचे सेमी नॉबी टायर आणि चौकोनी ट्यूब, सेमी-डबल क्रेडल फ्रेम स्थैर्य, दणकटपणा आणि वाहन चालविण्याचे सर्वोत्तम नियंत्रण देते तर तिचे सुधारित टँक पॅड आणि वृद्धिंगत केलेली फ्रंट फेंडर आव्हानात्मक स्थितीत अष्टपैलूत्व देते.

बजाज ऑटो – मोटरसायकलचे अध्यक्ष सारंग कानाडे यांनी या लाँचप्रसंगी बोलताना सांगितले की, “CT110Xच्या लॉन्चसोबत, आम्ही वैविध्यपूर्ण उत्पादन घेऊन आलो आहोत, हिच्या सर्वोत्तम वैशिष्ट्याने उत्पादनाचे मूल्य वाढवले आहे. वाहन चालवताना सर्वोत्तम आराम आणि टिकाऊपणा उपलब्ध करून देताना मायलेजच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. ज्या ग्राहकांना कायमच देखणे आणि बळकट बनावटीचे उत्पादन खरेदी करण्याची इच्छा होती, तसेच रस्त्याची आव्हानात्मक स्थिती झेलण्याची ताकद असलेली नवीन CT110X आहे. चालक केंद्री नाविन्य हे सीटी ब्रँडचे बीज आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, आमची नवीन ऑफरींग – CT110X, या सेगमेंटमध्ये आमच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यास आम्हाला मदत करणार आहे.”

CT110X भारतातील सर्व बजाज ऑटो विक्रेत्यांकडे चार रंगांमध्ये रुपये 55,494 (एक्स शोरूम – दिल्ली) किंमतीत उपलब्ध आहे.

CT110 X मध्ये विश्वासार्ह, वेळेच्या कसोटीवर खरे उतरलेले 115 सीसी डीटीएस-आय इंजिन देण्यात आले आहे, जे 6.33 केडब्ल्यू शक्तीसह 7500 आरपीएम, आणि 9.81 एनएम टोर्क देऊ करते (5000 आरपीएमला). हिचे सेमी नॉबी टायर कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर स्थिर आणि चांगली पकड देतात. तिचा सर्वोच्च ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएमप्रमाणे असून भारताच्या रस्त्यांना साजेसा आहे. या वाहनाचे व्हीलबेस 1285 एमएमचे असून वाईट आणि उतार-चढाव असलेल्या रस्त्यांवर चांगले स्थैर्य देतात.

CT110X चा दिमाख वाढविणारी अतिरिक्त महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

• चौकोनी ट्यूब, सेमी-डबल क्रेडल फ्रेम, जे चांगले स्थैर्य, दणकटपणा तसेच सर्वोत्तम रायडर कंट्रोल देते
• सुधारीत टँक-पॅडसोबत ग्रे-ब्लॅक क्लासी फिनीश
• उच्चतम फ्रंट-फेंडर जे देते आधुनिक दणकट रुबाब
• करडा आणि काळा रंग वाहनाच्या देखणेपणात भर घालतात

Parameter Bajaj CT110 X
Engine Capacity (cc) 115
Power (kW @ rpm) 6.33 @ 7500
Torque (Nm @ rpm) 9.81 @ 5000
Rear Suspension Spring-in-Spring (SNS)
Rear Tyre 3.00 x 17  50 P
Semi Knobby Tread Pattern
Ground Clearance (mm) 170
Kerb Weight (kg) 118
Overall Length (mm) 1998
Overall Width (mm) 753
Height (mm) 1098
Wheelbase (mm) 1285
Saddle Height (mm) 810