बजाज ऑटोकडून नवीन पल्सर १८० लॉन्च, स्टाईलिश डिझाईनसह सेगमेंटमध्ये जबरदस्त, जाणून घ्या काय आहे किंमत?

बजाज ऑटो’च्या वतीने नवीन पल्सर १८० लॉन्च करण्यात आली. लक्षवेधी डीकॅल्स आणि ट्वीन पायलट लॅम्प समवेत ऑटो हेड लॅम्प ऑन (एएचओ) पल्सर १८०ची स्टाईलिश डिझाईन देशातील १५० सीसी+ सेगमेंटमध्ये बाईक क्रांती आणणारी ठरली.

    मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय एन्ट्री-स्पोर्ट मोटरसायकल ब्रँडच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बजाज ऑटो’च्या वतीने नवीन पल्सर १८० लॉन्च करण्यात आली. लक्षवेधी डीकॅल्स आणि ट्वीन पायलट लॅम्प समवेत ऑटो हेड लॅम्प ऑन (एएचओ) पल्सर १८०ची स्टाईलिश डिझाईन देशातील १५० सीसी+ सेगमेंटमध्ये बाईक क्रांती आणणारी ठरली.

    या नव्या अवतारात या बाईकला स्पोर्टी स्प्लीट सीट, ब्लॅक अलोय व्हील आणि ‘इन्फिनिटी’ एलईडी टेल लॅम्पची जोड मिळाली आहे. बजाजची मोटरसायकल ४ – स्ट्रोक एसओएचसी २ – व्हॉल्व एअर कुल्ड बीएसVI युक्त डीटीएस-आय फाय इंजिनने युक्त आहे. याद्वारे १४.५२ एनएम (६५०० आरपीएम) गाठणे शक्य आहे. तसेच ८५०० आरपीएमला १२.५२ किलोवॅट उर्जा प्रदान करते. यामध्ये फ्रंट सस्पेन्शनमध्ये ५ – स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्स सोबत टेलीस्कोपिक अँटी फ्रिक्शन बुश सोबत रियर सस्पेंशनमध्ये ५-वे अडजेस्टेबल नायट्रोक्स शॉक एब्जॉर्व्हरचा समावेश आहे.

    ही नवीन पल्सर १८० हे सेगमेंट वेगाने वाढते आहे. ज्यांना सर्वोच्च गुणवत्ता, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय स्टाईल आणि जागतिक दर्जाची कामगिरी बजावणारे उत्पादन पाहिजे आहे, अशांकरिता हा उत्तम पर्याय ठरतो. सध्या१८०-२०० सीसी स्पोर्ट बाईकचे सेगमेंट २० % नी वाढले आहे. सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कामगिरी बजावणाऱ्या स्पोर्ट पर्यायांसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांकरिता नवीन पल्सर १८० उपयुक्त ठरते. हे नाव या प्रकारात भारतात अग्रणी राहिले असून मागील २० वर्षांत त्याला टक्कर देणारा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकला नाही. ही २०२१ पल्सर १८० रु. १,०७,९०७ /- (एक्स-शोरूम दिल्ली) मध्ये भारतातील सर्व बजाज ऑटो अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.