हमारा बजाज परत येतेय! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची मोठ्या प्रमाणात होत आहे विक्री, भारतातल्या या दोन शहरांमध्ये नोंदणी झाली सुरू

बजाज ऑटो कंपनीने (Bajaj Auto Company) आता चेन्नई (तामिळनाडू) आणि हैदराबाद (तेलंगणा) मधील चेतक खरेदीदारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू (Registration Process Start) केली आहे. बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी कंपनीने हैदराबादमधील कुकटपल्ली आणि काचेगुडा येथे डीलर्सची नियुक्ती केली आहे.

    नवी दिल्ली : जर तुम्हीही नवीन स्कूटर खरेदी (Buy A New Scooter) करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. होय, बजाज ऑटोच्या इलेक्ट्रिक स्कूटर ‘बजाज चेतक’ (Bajaj Auto Electric Scooter ‘Bajaj Chetak’) ची मागणी बाजारात झपाट्याने वाढत (Demand Increase In Market) आहे. सर्वत्र लोक ही स्कूटर खरेदी करण्यासाठी बुकिंग (Booking) करत आहेत. बजाज ऑटो कंपनी आपल्या चेतक इलेक्ट्रिकच्या विक्रीसाठी नवीन शहरांचा समावेश करत आहे.

    बजाज ऑटो कंपनीने (Bajaj Auto Company) आता चेन्नई (तामिळनाडू) आणि हैदराबाद (तेलंगणा) मधील चेतक खरेदीदारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू (Registration Process Start) केली आहे. बजाज चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी कंपनीने हैदराबादमधील कुकटपल्ली आणि काचेगुडा येथे डीलर्सची नियुक्ती केली आहे. कोलाथूर आणि अण्णा सलाई येथे ‘बजाज चेतक’ या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी चेन्नईमध्ये डीलरशीपची स्थापना करण्यात आली आहे.

    तसेच तेलंगणा आणि तामिळनाडू वगळता, भारतातील दोन राज्ये, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनीही ‘बजाज चेतक’ या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. बजाज कंपनीने 2022 पर्यंत भारतातील 22 शहरांमध्ये ही स्कूटर सादर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर ‘बजाज चेतक’ ची खास वैशिष्ट्ये

    बजाज इलेक्ट्रिक स्कूटर ‘बजाज चेतक’ मध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत

    स्कूटरमध्ये 3.8 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. ती 5 एचपी पॉवर आणि 16.2 एनएम टॉर्क जनरेट करते. तिची मोटर 3 kWh लिथियम-लोह बॅटरीसह जोडलेली आहे आणि या कारणास्तव कंपनी दावा करत आहे की, या स्कूटरची रेंज एकाच चार्जवर 95 किमी पर्यंत आहे. तर EV 70 kmph च्या टॉप स्पीडवर जाऊ शकते.