आता चिंताच सोडा; बेंगळुरू ची स्टार्ट-अप Log9 ची EV बॅटरी होणार अवघ्या १५ मिनिटांत चार्ज, १५ वर्ष गॅरेंटेड चालणारच

लॉग 9 च्या टीमने आपली सामूहिक विशेषज्ञता तसेच सुपरकॅपेसिटर प्रौद्योगिकी आणि ‘ग्राफीन’च्या ज्ञानाच्या आधारावर ही बॅटरी तयार केली आहे. ही नॅनो प्रौद्योगिकी कंपनी ‘ग्राफीन’ मध्ये माहीर आहे.तर कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी दुचाकी वाहनांसाठी 70 किमी आणि तीनचाकी वाहनांसाठी 60 किमीचा ॲव्हरेज देणार आहे.

    बेंगळुरू : बेंगळुरूतील टेक्नोलॉजी सेक्टर ची स्टार्ट-अप कंपनी लॉग 9 मटेरियल्स (Log 9 Materials) ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicles) साठी वेगाने चार्ज होणारी बॅटरी (Battery) टेक्नोलॉजी आणली आहे. कंपनी का दावा आहे की, ही बॅटरी, दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी अवघ्या 15 मिनिटांहूनही कमी वेळात पूर्णपणे चार्ज करणार आहे.

    लॉग 9 च्या टीमने आपली सामूहिक विशेषज्ञता तसेच सुपरकॅपेसिटर प्रौद्योगिकी आणि ‘ग्राफीन’च्या ज्ञानाच्या आधारावर ही बॅटरी तयार केली आहे. ही नॅनो प्रौद्योगिकी कंपनी ‘ग्राफीन’ मध्ये माहीर आहे.तर कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी दुचाकी वाहनांसाठी 70 किमी आणि तीनचाकी वाहनांसाठी 60 किमीचा ॲव्हरेज देणार आहे.

    या बॅटरीज फक्त 15 मिनिटांत चार्ज होणार नाही तर 15 वर्षाहूनही अधिक टिकणाऱ्या आहेत म्हणजेच या अर्थ असा की या बॅटरीची एक्सपायरी डेट 15 वर्षांची असणार आहे. यामुळे प्रति किलोमीटरमागे बॅटरीची किंमत देखील कमी होईल असेही कंपनीने नमूद केले आहे.

    भारतीय प्रौद्योगिकी संस्थान-रुरकी (आईआईटी-रुरकी) स्टार्ट-अप कंपनीने पुढील आर्थिक वर्षाअखेरीस या बॅटरी पॅक 3,000 हून अधिक वाहनांमध्ये बसविण्याची योजना आखली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 पर्यंत या बॅटरिज 20,000 हून अधिक वाहनांमध्ये बसविण्यात येणार आहेत.