BMW ने भारतात सादर केली ‘ही’ कार; किंमत ऐकूनच डोक्याचं होईल भजं

या कारची निर्मिती चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आली आहे. या कारचं एम इंजिनही भारतात तयार करण्यात येणार आहे. ही एक ऑल व्हिल ड्राइव्ह आहे आणि हिचे एम सपोर्ट फीचर जबरदस्त ड्रायविंग अनुभव देईल.

    नवी दिल्ली : जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी बीएम डब्ल्यू (BMW) ने बुधवारी आपली बहुप्रतिक्षित कार एम 340 आय एक्सड्राइव (M340i xDrive) भारतात सादर केली आहे. कंपनीने असंही म्हटलंय की, या कारची बुकिंग (Booking) शुक्रवारपासून सुरू होणार आहे. याची किंमत 62.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

    कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, या कारची निर्मिती चेन्नईतील कारखान्यात तयार करण्यात आली आहे. या कारचं एम इंजिनही भारतात तयार करण्यात येणार आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रांत पावा म्हणाले, “प्रथमच बीएमडब्ल्यू एम340आय एक्सड्राइव्ह सादर केल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, जी भारतात स्थानिक पातळीवर निर्माण झालेली सर्वाधिक वेगवान कार आहे.”

    ही एक ऑल व्हिल ड्राइव्ह आहे आणि हिचे एम सपोर्ट फीचर जबरदस्त ड्रायविंग अनुभव देईल. हिचा आकर्षक स्पोर्टी लूक आणखी आकर्षक व्हावा म्हणून ग्राहक अनुकूल म्हणजेच यात ग्राहकांच्या पसंतीनुसार कारला कस्टमाइज करण्याचा ऑप्शनही दिला आहे.