Credit: @BMWBikesIndia
Credit: @BMWBikesIndia

स्टाइलच्या बाबतीत आर 18 पूर्णपणे पूर्वीसारखीच बेस्ट आहे. यात एक मोठी विंडस्क्रीन, प्रवासी सीट, सॅडल बॅग, एलईडी अतिरिक्त हेडलाइट्स आणि 16 इंचाची फ्रंट व्हील दिली आहे. ही बीएमडब्ल्यू द्वारा निर्मित आजवरचे सर्वात मोठे बॉक्सर इंजिन आहे.

  गुरुग्राम (हरियाणा): बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया (BMW Motorrad India) ने भारतात बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिक (BMW R 18 Classic) लाँच केली आहे. ही नवी बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिक आजपासूनच बीएमडब्ल्यू च्या कोणत्याही मोटर डिलर नेटवर्क माध्यमातून ऑर्डर देऊन बुक करू शकता.

  एक भावनात्मक राइड प्रदान करण्यासाठी नवीन बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिकचं डिझाईन जुन्या आणि नव्या जमान्याशी क्लियर-कट तत्रंत्रानाशी मिळतंजुळतं ठेवण्यात आलं आहे. जे एक उत्तम राइडचा अनुभव देण्यास सक्षम आहे. स्टाइलच्या बाबतीत आर 18 पूर्णपणे पूर्वीसारखीच बेस्ट आहे. यात एक मोठी विंडस्क्रीन, प्रवासी सीट, सॅडल बॅग, एलईडी अतिरिक्त हेडलाइट्स आणि 16 इंचाची फ्रंट व्हील दिली आहे. ही बीएमडब्ल्यू द्वारा निर्मित आजवरचे सर्वात मोठे बॉक्सर इंजिन आहे.

  किंमत

  तथापि, नवी बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिक ‘फर्स्ट एडिशन’ ची किंमत 24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.सोबतच ग्राहकांना तीन वर्ष, अमर्याद किलोमीटर साठी एक मानक वॉरंटीही मिळेल, ज्यात वॉरंटी वाढविण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.

  इंजिन

  बीएमडब्ल्यू आर 18 क्लासिक का केंद्र बिंदू एक नवीन विकसित एअर / ऑईल-कूल्ड टू-सिलेंडर 1,802 सीसीचे बॉक्सर इंजन आहे. ही 4,750 आरपीएम वर 91 एचपी ची पावर जनरेट करते. 3,000 आरपीएम वर ही 158 एनएम चा अधिकाधिक टॉर्क जनरेट करते. 150 एनएम पर 2,000 से 4,000 पीपीएम हून अधिकची पावर निर्माण करते यात 6-स्पीड गियर ट्रान्समिशनचा समावेश आहे.