BMW ची S1000R भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

2021 साठी, कंपनी नवीन S1000R एक्सीटीरियरमध्ये अनेक अपडेट्स करुन बाईक सादर करणार आहे. बाईकच्या पुढील बाजूस नवीन एलईडी हेडलाइट सेटअपचा वापर करण्यात आला आहे. नवी हेडलँप 2021 BMW G310R आणि F900R बाईक्सप्रमाणे डिझाईन लाईनवर बनवण्यात आले आहेत.

    मुंबई : बीएमडब्ल्यू मोटरराड (BMW Motorrad) लवकरच बीएस 6-अनुरूप S1000R बाईक भारतीय बाजारात सादर करणार आहे.  ही बाईक आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि भारतीय मॉडेल जवळपास परदेशात विकल्या जाणाऱ्या युनिटप्रमाणेच असेल.

    2021 साठी, कंपनी नवीन S1000R एक्सीटीरियरमध्ये अनेक अपडेट्स करुन बाईक सादर करणार आहे. बाईकच्या पुढील बाजूस नवीन एलईडी हेडलाइट सेटअपचा वापर करण्यात आला आहे. नवी हेडलँप 2021 BMW G310R आणि F900R बाईक्सप्रमाणे डिझाईन लाईनवर बनवण्यात आले आहेत.

    राइडिंग मोड्स प्रो, इंजिन ब्रेक कंट्रोल, पॉवर व्हीली कंट्रोल आणि डायनॅमिक ब्रेक कंट्रोल (DBC) यांसारख्या इतर काही ऑप्शनल फीचर्सचा समावेश आहे.