कारला सायकल कॅरिअर बसवा आणि कधीही, कुठेही, सायकल चालविण्याचा मनसोक्त आनंद घ्या

गेल्या काही वर्षांपासून लेह-लडाख, काश्मीरच्या हिमशिखरांतून सायकल सफारीही अनेक निघत आहेत. हौस म्हणून सायकल चालवणारे अनेकजण असतात, ते एखाद्या निवांत रस्त्यावर जाऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतात. मात्र, बऱ्याच वेळा सायकल न्यायची कशी असा प्रश्न पडतो.

  कार, बाइक याबरोबरच सायकलवरून फिरण्याची मजा काही औरच. हल्लीच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यांवर आणि प्रदूषणाच्या विळख्यात निवांतपणे सायकल चालवायला जागा मिळते कुठे? सायकल वेड्यांसाठी आता कारमध्ये सायकल नेण्यासाठी विशेष असे कॅरिअर बाजारात आले आहेत.

  गेल्या काही वर्षांपासून लेह-लडाख, काश्मीरच्या हिमशिखरांतून सायकल सफारीही अनेक निघत आहेत. हौस म्हणून सायकल चालवणारे अनेकजण असतात, ते एखाद्या निवांत रस्त्यावर जाऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतात. मात्र, बऱ्याच वेळा सायकल न्यायची कशी असा प्रश्न पडतो.

  अनेकदा गाडीच्या डिक्कीत नाही, तर वरच्या कॅरिअरला दोरीने बांधून सायकल नेतात; पण यामुळे कारला ओरखडे पडू शकतात. सायकलही खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी कारला सायकल रॅक बसवावे लागते. बाजारात या सायकल कॅरिअरचे बरेच प्रकार सध्या पाहायला मिळताहेत.

  सायकल कॅरिअरविषयी…

  • या कॅरिअरला जास्तीत जास्त तीन सायकल बसवता येतात. 45 ते 50 किलो वजनापर्यंत सायकल आपण त्याला फिट करू शकतो.
   हे कॅरिअर ॲल्युमिनियम धातूपासून बनवतात. त्यामुळे त्याची वजन पेलण्याची क्षमता चांगली असतेच; शिवाय गंज लागण्यापासूनही ते सुरक्षित राहू शकतात.
  • मुख्यत्वे हे सायकल कॅरिअर फोल्ड करता येतात. त्यामुळे सायकल काढल्यावर ते फोल्ड करून कारमध्येही आपण ठेऊ शकतो.
  • काही कॅरिअरला रेडियमचे रिफ्लेक्टर बसवलेले असतात, जेणेकरून रात्रीच्या वेळी मागील वाहनास ते सायकल कॅरिअर दिसावे आणि धडक होऊ नये.
  • हे सायकल कॅरिअर ॲल्युमिनियमचे असले, तरी त्याला बाहेरून रबर फोम किंवा कुशन बसवलेले असतात. यामुळे कारला अथवा सायकलला त्या कॅरिअरमुळे स्क्रॅच पडत नाहीत.
  • सायकलच्या पॅडलच्या सरंक्षणासाठीही स्वतंत्र रबर कुशन असतात.
  • या सायकल कॅरिअरला कोणतीही जास्तीची टूल्स किंवा ॲक्सेसरी लागत नाही.