Corona Side Effects : ऑटोमोबाइल क्षेत्रात उलथापालथ; कोरोनामुळे कारविक्री, उत्पादनात घट

संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी युरोपमध्ये कार उत्पादनात २१ टक्क्यांची घट झाली. तर, उत्तर अमेरिकेत २० टक्के आणि दक्षिण अमेरिकेत ३० टक्क्यांनी कार उत्पादन कमी झाले. याचबरोबर, आशियामध्ये कार उत्पादनात १० टक्क्यांची घसरण झाली.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

    कोरोना महासाथरोगामुळे गेल्या वर्षी जगभरातील कार कंपन्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्सच्या मते, कोरोना संकटामुळे २०२० साली जगभरातील कार उत्पादनात १६ टक्क्यांची घट झाली. वर्षभरात सुमारे ७.८ कोटी (७८ मिलियन) रुपयांनी कार विक्री कमी झाली. गेल्यावर्षी ऑटो सेक्टरला आजपर्यंतच्या सर्वात वाईट काळाचा सामना करावा लागला.

    संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी युरोपमध्ये कार उत्पादनात २१ टक्क्यांची घट झाली. तर, उत्तर अमेरिकेत २० टक्के आणि दक्षिण अमेरिकेत ३० टक्क्यांनी कार उत्पादन कमी झाले. याचबरोबर, आशियामध्ये कार उत्पादनात १० टक्क्यांची घसरण झाली. जगभरातील एकूण कार उत्पादनापैकी निम्मे उत्पादन आशियात होते.