वाढते आहे EVची मागणी, बजाज च्या ई-स्कूटरमध्ये 465% झाली मासिक वाढ, जाणून घ्या वर्षाला किती रुपयांची होणार आहे बचत

बजाज आणि टीव्हीएस या दोघांनीही देशातील अनेक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आखली आहे. चेतक सध्या पुणे आणि बेंगलुरुमध्ये उपलब्ध आहे, तर आयक्यूबचे अस्तित्व बेंगळुरू आणि दिल्ली येथे आहे.

  नवी दिल्ली: जग आता इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या (Electric Mobility) दिशेने वेगाने पुढे जात आहे हे आता अगदी बरोबर सिद्ध झालंय. आमच्याकडे आधीपासूनच भारतात बरेच ईव्ही उत्पादक आहेत. तथापि, बरीच मोठी नावे नजीकच्या काळात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी जोडली जाणार आहेत, तर विद्यमान वाहन निर्माता कंपन्या त्यांचा खप वाढवतील.

  बाजारात बरेच इलेक्ट्रिक टू व्हिलर ब्रँड आहेत, चेतक आणि आयक्यूब (Chetak and iQube) हे मुख्य प्रवाहातल्या उत्पादकांपैकी आहेत. पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकी वाहनांच्या तुलनेत विक्रीची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. पण लवकरच यामध्ये बदल होऊ शकेल, बजाज आणि टीव्हीएस या दोघांनीही देशातील अनेक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याची योजना आखली आहे. चेतक सध्या पुणे आणि बेंगलुरुमध्ये उपलब्ध आहे, तर आयक्यूबचे अस्तित्व बेंगळुरू आणि दिल्ली येथे आहे.

  बजाज चेतकच्या ई-स्कूटरने इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीत एक नवीन विक्रम नोंदविला आहे. माहितीनुसार, एप्रिल दरम्यान या ई-स्कूटरने मासिक तत्वावर विक्रीत 464.44% वाढ नोंदविली आहे.

  प्राप्त माहितीनुसार, बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटरने मार्च महिन्यात 90 युनिटची विक्री केली. पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये हा आकडा 508 युनिट्सवर पोहोचला. पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकप्रिय होत असल्याचे आकडेवारी पाहून हे स्पष्टपणे समजू शकते. त्याच वेळी, टीव्हीएसच्या बाबतीत, मार्चमध्ये त्याच्या आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरच्या 308 युनिट्सची विक्री झाली.

  या आहेत नवीन किंमती

  वेरियंट

  जुनी कीमत

  नवीन कीमत

  प्रीमियम 1.20 लाख रुपये 1.45 लाख रुपये
  अर्बन 1.15 लाख रुपये 1.43 लाख रुपये

  बॅटरी

  चेतकमध्ये 3 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली गेली आहे, जी 3.8 kWच्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेली आहे. ही 5.5 Ps जास्तीत जास्त उर्जा निर्माण करते. ती इको मोडमध्ये जास्तीत जास्त 95 किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किमीचे मायलेज देते. ही बॅटरी 100% चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात. या बॅटरीवर 3 वर्षांची किंवा 50,000 किमीची वॉरंटी आहे.

  फीचर्स

  चेतकच्या स्कूटरला ऑल-एलईडी दिवे (हेडलॅम्प्स, डीआरएलएस, टर्न इंडिकेटर, टेललाईट्स), फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह) सह रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील मिळते.

  या वाहनांना देणार टक्कर

  चेतक इलेक्ट्रिकची अथर 450 प्लस आणि अथर 450 एक्स सोबत तगडी स्पर्धा असणार आहे. या दोन्ही स्कूटरच्या किंमती आहेत – 1.40 लाख रुपये आणि 1.59 लाख रुपये. त्याचबरोबर टीव्हीएसच्या आयक्यूबची किंमत 1.36 लाख रुपये आहे.

  कशी होणार बचत

  • जर आपण 1 लाख रुपयांच्या किंमतीवर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली असेल आणि आपल्या
   शहरातील एका युनिट विजेची किंमत 8 रुपये आहे, तर आपल्याला ईव्ही चार्ज करण्यासाठी सुमारे 2 युनिट्स लागतील, म्हणजे आपल्याला फक्त 16 रुपये खर्च करावे लागतील.
  • जर 16 रुपयांत ईव्ही 50 ते 70 किमीचे मायलेज देत असेल तर महिन्याला तुमचे एकूण 480 रुपयेच खर्च होतील.
  • त्याचबरोबर वर्षाच्या अनुषंगाने तुमचे 6000 रुपये खर्च होतील.
  • तसेच ईव्ही बॅटरीवर कंपन्या 50 हजार ते 1 लाख किमी किंवा 5 वर्षाची वॉरंटी देतात आणि पेट्रोल किंवा डिझेल वाहनांप्रमाणेच यांच्या देखभाल-दुरुस्तीचाही काहीच खर्च नाही.

  demand for electric vehicles is increasing bajajs e scooter has 465 monthly growth know how much rupees will be saved annually in details