Detel या वर्षी ई-वाहनांसाठी उत्तर भारतात सुरू करणार 150 विक्री आऊटलेट्स

देशी ईव्ही निर्माता कंपनीने आपला विस्तार करत असतानाच प्राथमिक व्यापारांव्यतिरिक्त उप-विक्रेत्यांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने ही योजना आखली आहे. 100 टक्के स्थानिक इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन करण्याच्या उद्देशाने Detel ने गुरुग्राम येथे दरवर्षी 1 लाख कमी गतीची इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी एक असेंब्ली युनिट उघडण्याचीही योजना तयार केली आहे.

    नवी दिल्ली : देशी ब्रँड Detel ने यावर्षाअखेर आपल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicles) उत्तर भारतात (North India) 150 विक्री आऊटलेट्स नेटवर्क (Sales Outlets Network) स्थापन करण्याची योजना आखली असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स (Electric Two-Wheelers) च्या नवीन रेंज सह या क्षेत्रात आपला विस्तार करायचा आहे.

    देशी ईव्ही निर्माता कंपनीने आपला विस्तार करत असतानाच प्राथमिक व्यापारांव्यतिरिक्त उप-विक्रेत्यांनाही सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने ही योजना आखली आहे. 100 टक्के स्थानिक इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन करण्याच्या उद्देशाने Detel ने गुरुग्राम येथे दरवर्षी 1 लाख कमी गतीची इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी एक असेंब्ली युनिट उघडण्याचीही योजना तयार केली आहे.

    Detel चे संस्थापक योगेश भाटिया या प्रसंगी म्हणाले की, “आम्ही संपूर्ण भारतात नवीन डिलरशीप नेटवर्क तयार करण्याच्या आपल्या योजनांवर वेगाने काम करत आहेत. आमची अधिग्रहित डीलरशिप Detel चे ध्येय बळकट करेल आणि स्मार्ट, टिकाऊ आणि परवडणार्‍या उत्पादनांसह लाखो लोकांपर्यंत पोहोचेल.”

    या योजनेचे उद्दिष्ट प्रमुख बाजारात वेगाने शिरकाव करून वर्चस्व प्रस्थापित करणे आणि कमी वेगाच्या ईव्ही सेगमेंटमध्ये विक्री आणि बाजारातील भागीदारी वाढविणे आहे असंही भाटिया म्हणाले.

    डेटेल 2017 पासून आपले इलेक्ट्रिक सामान आणि उपभोक्ता गॅजेट्ससोबतच भारतीय बाजारात आपला आब राखून आहे. जानेवारी 2020 मध्ये, कंपनीने भारतीय ग्राहकांना स्मार्ट ईव्ही वाहनांची सुविधा देण्यासाठी ईव्ही उद्योगात प्रवेश केला होता.