maruti suzuki

मारुती सुझुकीच्या(maruti suzuki car prize hike from 1 april) गाड्यांच्या किमतीत मात्र वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. एप्रिल महिन्यापासून कारच्या निवडक मॉडेलवरील किमतीत वाढ केली जाणार आहे. अंतर्गत खर्च वाढल्यामुळे किमतीत वाढ केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

  दिल्ली: देशात मारुती सुझुकीच्या कार(maruti suzuki) स्वस्त आणि कमी बजेटच्या मानल्या जातात. तथापि आता मारुती सुझुकीच्या गाड्यांच्या किमतीत मात्र वाढ(maruti suzuki car prize hike form 1 april) करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. एप्रिल महिन्यापासून कारच्या निवडक मॉडेलवरील किमतीत वाढ केली जाणार आहे. अंतर्गत खर्च वाढल्यामुळे किमतीत वाढ केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

  नव्या किमती १ एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यापासून मारुती आल्टोपासून मारुती ब्रेझापर्यंतच्या सर्व मॉडेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वर्षभरात मारुती सुझुकी दुसऱ्यांदा वाढ करीत आहे. यापूर्वी कंपनीने गेल्या जानेवारी महिन्यात किमती वाढविल्या होत्या.

  मंदीचा सामना
  तथापि, कारच्या किमतीत किती वाढ केली जाणार आहे हे वेगवेगळ्या मॉडलनुसार ठरविले जाणार आहे. याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. उल्लेखनीय असे की गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाचा सामना करीत असलेला वाहन उद्योग मंदीचाही सामना करीत आहे. मागणीत झालेली घट आणि वाढता खर्च आणि कच्च्या मालात झालेली वाढ यामुळे कंपनीसमोर अडचणीही उभ्या ठाकल्या आहेत. जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीने कारच्या किमतीत ३४०००रुपयांची वाढ केली होती तर महिंद्रा ॲन्ड महिंद्राने १.९% तर टाटा मोटर्सने जवळपास २६००० रुपयांची वाढ केली होती.

  वाहन उद्योगावर कोरोना संकट

  यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत १८ % वाढ झाल्याचे दिसून आले आहे तर दुसरीकडे दुचाकींच्या विक्रीतही १० % वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यानंतर देशातील वाहन उद्योग मंदगतीने पण रुळावर येताना दिसत आहे.