nitin gadkari

अमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय सुक्ष्म व लघू उद्योग (एमएसएमई ) मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. एमएसएमई उद्योगाचा देशातील जीडीपीत 40 टक्क्यापर्यंत हिस्सा वाढण्याची गरज केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

    दिल्ली : अमेरिकेची ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हिकल एलएलसी कंपनीही भारतीय बाजारात येणार आहे. या कंपनीची इलेक्ट्रिक कार ही टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारहून अधिक चांगली असल्याचे केंद्रीय सुक्ष्म व लघू उद्योग (एमएसएमई ) मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. एमएसएमई उद्योगाचा देशातील जीडीपीत 40 टक्क्यापर्यंत हिस्सा वाढण्याची गरज केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

    गडकरी पुढे म्हणाले की, जग हे आता चीन सोडून भारताला पसंती देत आहे. आपल्याला जीडीपी आणि कृषीचा विकासदर वाढविण्याची गरज आहे. आपण भारताला जगामधील एक बळकट अशी अर्थव्यवस्था असलेला देश बनवू शकतो.

    यावेळी खाद्यतेलाबाबतही भारताने आत्मनिर्भर होण्याची गरजही गडकरी यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले.