electric scooters and bikes launched this year nrvb

स्कूटर मध्ये कनेक्टेड टेक्नॉलजीसह स्मार्ट एक्सकनेक्ट प्लेटफॉर्म दिला आहे. स्कूटर में जिओ-फेंसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्ट सारखे अनेक फीचर्स मिळतील. यात क्यू-पार्क असिस्ट, डे एंड नाइट डिस्प्ले आणि रिजेनरेटिव ब्रेकिंग सारखे फीचर्सही दिले आहेत.

नव्या वर्षात भारतीय बाजारात इलेक्ट्रिक टू व्हिलरचाही बोलबाला पाहायला मिळणार आहे. यात बंगळुरूची कंपनी अथर सोबत टीव्हीएस आणि ओडिसी यांचाही समावेश आहे. देशात इलेक्ट्रिकल वाहनांची क्रेझही हळूहळू वाढताना दिसत आहे. नव्या वर्षात या स्कूटर आणि बाइकही लोकांच्या पसंतीस उतरतील अशी आशा बाजारात व्यक्त करण्यात येत आहे. जाणून घेऊयात अशाच बाईक्सबाबत

TVS आयक्युब

टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटर आयक्युबमध्ये 4.4 kW इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. ही ५ तासांत पूर्णपणे चार्ज होते. एकदा चार्ज केल्यावर ही 75 किमी अंतर कापते असा कंपनीचा दावा आहे. ही 0 ते 40 किमी अंतर प्रतितास वेग ४.२ सेकंदात पूर्ण करते. स्कूटरचा सर्वाधिक वेग 78 किलोमीटर प्रतितास आहे.यात पावर आणि इकॉनॉमी चे दोन रायडिंग मोड आहेत.

स्कूटर मध्ये कनेक्टेड टेक्नॉलजीसह स्मार्ट एक्सकनेक्ट प्लेटफॉर्म दिला आहे. स्कूटर में जिओ-फेंसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि एसएमएस अलर्ट सारखे अनेक फीचर्स मिळतील. यात क्यू-पार्क असिस्ट, डे एंड नाइट डिस्प्ले आणि रिजेनरेटिव ब्रेकिंग सारखे फीचर्सही दिले आहेत.

आयक्युबच्या फ्रंट मध्ये हँडलच्या मध्यभागी ब्लॅक काउल आहे. स्कूटर मध्ये U-शेप एलईडी डिआरएल, क्रिस्टल-क्लियर एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टेललॅम्प दिले आहेत. या बाइकची विक्री 27 जानेवारीपासून बेंगळुरूमध्ये सुरू होईल. हिची ऑनरोड किंमत 1.15 लाख रुपये आहे. त्यानंतर देशातल्या अन्य मुख्य शहरांत हिची विक्री सुरू होईल.

अथर 450X

बेंगळुरु स्थित अथर एनर्जीही नव्या वर्षात तिची नवी इलेक्ट्रिक स्कटूर अथर 450X लाँच करणार आहे. कंपनी आजवर आपल्या स्कूटर को बेंगळुरु आणि दिल्लीतच विक्री करत आली आहे पण, आता हिची देशभरात विक्री करण्यात येणार आहे. कंपनीने या बाइकची प्री-बुकिंग सुरू केली आहे. टेस्ट ड्राइव्हसाठी ही उपलब्ध आहे. ही ग्रे, ग्रीन आणि व्हाइट अशा तीन रंगात उपलब्ध आहे. ही 450X प्लस आणि 450X प्रो अशा दोन वेरियंटमध्ये येते.

यात 2.9kwh बॅटरी पॅक आहे. यात 6kW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, जी 8bhp ची पावर आणि 26Nm टॉर्क जनरेट करते. बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर ही 85Km अंतर कापते असं कंपनीने स्पष्ट केलंय. यात इको राइड, स्पोर्ट आणि वार्पचे चार ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. ईको मोडवर 85 किमी, राइड में 72 किमी, स्पोर्ट्स में 60 किमी अंतर कापते. तथापि तिची अधिकृत अंतर कापण्याची क्षमता ११६ किमी आहे. हिचा टॉप स्पीड 80km/h आहे. ही 0-40 किमी वेग प्रतितास या वेगाने ३.३ सेकंदात पार करते.

यात अँड्रॉइड बेस्ड युजर इंटरफेस दिला आहे. इसमें डार्क मोड आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी फीचर दिले आहे, यामुळे राइडर मोबाइल बर येणारे कॉलही रिसिव्ह किंवा कॅन्सल करू शकतो. दिल्लीत 450X प्लसची किंमत 1.35 लाख रुपये आणि 450X प्रो ची किंमत 1.45 लाख रुपयांच्या जवळपास आहे.

ओडिसी एवोकिस

भारतीय ऑटो बाजारात नव्या वर्षात ओडिसी एवोकिस इलेक्ट्रिक बाइकही आपल्या नजरेस पडेल. या बाइकमध्ये स्पोर्टी लूक आणि स्टाइलचे कॉम्बिनेशन पाहायला मिळेल.

बाइकमध्ये 6hp ची पावर आणि 64Nm चा टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर मिळेल. कंपनीचा दावा आहे की, हिची बॅटरी 6 तासांत चार्ज होईल. यानंतर ही 150 किमी अंतर पार करेल. बाइकशी संबंधित संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.या बाइकची एक्स शोरूम किमत 1.50 लाख रुपयांच्या आसपास असेल. सुरूवातीला देशातल्या महत्त्वाच्या शहरात हिची विक्री होईल.