EVTRIC Motors ने ‘ईव्हीट्रिक एक्सिस आणि ईव्हीट्रिक राईड’ ईस्कूटर्स केल्या लाँच

EVTRIC एक्सिस मर्क्युरी व्हाईट, पर्शियन रेड, लेमन यलो आणि एंपरर ग्रे अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन EVTRIC राईडची संरचना केली गेली आहे व त्यामध्ये बसण्याची अधिक जागा उपलब्ध आहे व ती डीप सेर्युलियन ब्ल्यू, पर्शियन रेड, सिल्व्हर, नोबेल ग्रे व मर्क्युरी व्हाईट अशा लक्षवेधी रंगांमध्ये मिळते.

  मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील EVTRIC Motors ह्या नवीन व्हेंचर्सने स्लो स्पीड प्रकारातील ईव्हीट्रिक एक्सिस आणि ईव्हीट्रिक राईड या दोन ई स्कूटर्स लाँच केल्या आहेत. यांचे मूल्य अतिशय वाजवी असून अनुक्रमे त्यांची एक्स शोरूम किंमत रू. 64,994/- आणि 67,996/- रुपये आहे. भारतातील चालू ई- मोबिलिटी उपक्रमामध्ये सहभाग घेण्याच्या आपल्या प्रयत्नाच्या दिशेने EVTRIC ने ह्या उत्पादनांची घोषणा केली आहे. ह्या ई- स्कूटर्सचे लक्ष्य भारतातील युवा व कुटुंब ग्राहक हे आहेत जे जवाबदार पद्धतीने प्रवास व पर्यावरण अनुकूल पद्धतींबाबत सजग आहेत.

  EVTRIC एक्सिस मर्क्युरी व्हाईट, पर्शियन रेड, लेमन यलो आणि एंपरर ग्रे अशा चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन EVTRIC राईडची संरचना केली गेली आहे व त्यामध्ये बसण्याची अधिक जागा उपलब्ध आहे व ती डीप सेर्युलियन ब्ल्यू, पर्शियन रेड, सिल्व्हर, नोबेल ग्रे व मर्क्युरी व्हाईट अशा लक्षवेधी रंगांमध्ये मिळते.

  ह्या ई- स्कूटरसह काढता येणारी लिथियम आयन बॅटरीचा पर्याय मिळतो ज्यामुळे वापरणाऱ्यांना चार्ज करण्याची सुविधा मिळते. ह्या स्कूटर्सची लोडिंग क्षमता 150 किलो आहे व 250 व्हॉट्स मोटर शक्ती आहे. दोन्ही स्कूटर्सना पूर्ण बॅटरी चार्ज व्हायला साधारण 3.5 तास लागतात व एका वेळी पूर्ण चार्ज केल्यावर ती 75 किमी अंतर जाऊ शकते व सर्वाधिक वेग ताशी 25 किमी इतका मिळतो.

  ह्या उत्पादनांमध्ये एलईडी हेडलँप्स, रोबोटिक वेल्डिंग चेसिस, साईड स्टँड सेन्सर व खड्डे असलेल्या रस्त्यांवर कोणत्याही त्रासाशिवाय राईड करण्यासाठी 190 मिमी ग्राउंड क्लिअरन्स असलेले 12 इंच ट्युबलेस टायर आदी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. ह्या ई- स्कूटर्सद्वारे ईव्हीचा ग्राहकांचा अनुभवही आणखी सुधारित होतो व त्यामध्ये असलेल्या विशिष्ट रिव्हर्स पार्क असिस्ट फंक्शनमुळे ते एक अनेक वैशिष्ट्ये असलेले वाहन ठरते. ग्राहकांसाठी हा ब्रँड बॅटरीवर 2+ वर्षांची वॉरंटीसुद्धा देत आहे.

  EVTRIC कंपनीच्या वेबसाईटवर ( https://evtricmotors.com ) आणि अन्य काही रिटेलर्स जसे– ई व्हीलर्स (https://www.ewheelers.in), क्विकरी कार्ट (https://www.quickrycart.com), आणि आतियास मोबिलिटी प्रा. लि. ( www.Atiyaselectric.Com ) इथे शून्य बुकिंग रकमेसह ऑनलाईन व ऑफलाईन प्रकारे बुकिंग सुरू होईल.

  आम्ही एक दशकाहून अधिक काळापासून ऑटोमेशनच्या क्षेत्रात आहोत. आणि आम्ही आता भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासामधील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी क्रांतीला साकार करत आहोत. आजच्या तंत्रज्ञानानुसार दररोज प्रवास करणा-यांसाठी योग्य पर्याय ठरेल अशा पद्धतीच्या स्लो स्पीडच्या ई-स्कूटर प्रकारामध्ये आम्ही सुरुवात केली आहे. वाजवी खर्चामध्ये प्रवास आणि सुलभ अनुभव ह्यासह ही उत्पादने ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करतील.”

  मनोज पाटील, एमडी व संस्थापक, ईव्हीट्रिक मोटर्स

  पीएपीएल ह्या भारतातील ऑटोमेशनच्या जगतामध्ये अनुभव असलेल्या कंपनीने अलीकडेच भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीला आणखी पुढे नेण्यासाठी ईव्हीटीआरआयसी मोटर्सचा शुभारंभ केला आहे. सायकली, इलेक्ट्रिक स्कूटर्स, ईव्ही मोटरसायकली आणि इलेक्ट्रिक तीन चाकींद्वारे ईव्ही पद्धतीमधील सर्वोत्तम बाबी ग्राहकांना उपलब्ध करण्याच्या दिशेने कंपनी कार्यरत आहे.

  EVTRIC Motors launches Evitric Axis and Evitric Ride scooters