२०३० पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या वापरासाठी फ्लिपकार्ट क्लायमेट ग्रुपची भागीदारी

बंगळुरु : आपल्या संपूर्ण ई-कॉमर्स मूल्यसाखळीत दिर्घकालीन शाश्वतता जपण्याची बांधिलकी अधोरेखित करत फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेने क्लायमेट ग्रुपच्या जागतिक ईलेक्ट्रिक दळणवळणाच्या ईव्ही१०० उपक्रमात सहभागी होत ईलेक्ट्रिक वाहनांच्या वापराची बांधिलकी आज जाहीर केली. दळणवळणाच्या साधनांना इलेक्ट्रिक व्हेईकल्समध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया वेगवान करत २०३० पर्यंत इलेक्ट्रिक दळणवळणाला ‘न्यू नॉर्मल’ बनवणाऱ्या, भविष्याचा वेध घेणाऱ्या कंपन्यांना ईव्ही१०० च्या माध्यमातून एकत्र आणले जात आहे.

या बांधिलकीचा भाग म्हणून आणि ईव्हीच्या वापराला व्यापक स्तरावर पाठिंबा देण्यासाठी फ्लिपकार्ट टप्प्याटप्प्याने आपल्या संपूर्ण फ्लीटमध्ये (थेट मालकीची किंवा भाडेतत्वावरील कॉर्पोरेट फ्लीट) २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यास बांधिल आहे. सेवा करारांमध्ये हा मुद्दा नमूद करणे, वितरण साखळी आवारांच्या परिसरात सुमारे १४०० चार्जिंग सुविधा उभारणे, जागरुकता उपक्रम राबवणे आणि डिलिव्हरी एग्झिक्युटीव्जना इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरासाठी प्रोत्साहन या पद्धतीने हे लक्ष्य गाठले जाणार आहे. कर्मचारी, डिलिव्हरी भागीदार आणि कामगार अशा आपल्या संपूर्ण परिसंस्थेत ईव्हीला प्राधान्य देत फ्लिपकार्ट या क्षेत्रातील शाश्वत बदलांना चालना देणार आहे आणि २०३० पर्यंत इलेक्ट्रिक दळणवळणाचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत नेण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला हातभार लावणार आहे.

फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “ई-कॉमर्स सर्व भागधारकांसाठी अधिक समावेशक, प्रगतीशील आणि परिणामकारक करताना एक देशी कंपनी म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. या भागधारकांमध्ये समाज आणि आपल्या या ग्रहाचाही समावेश आहे. आमच्या ग्राहकांच्या गरजा जबाबदारीने आणि सजगतेने पूर्ण करण्यासाठी स्थानिक बाजारपेठेत आम्ही ही तत्वं अंगिकारत आहोत. क्लायमेट ग्रूपच्या ईव्ही१०० उपक्रमातील आमचा सहभाग शाश्वत पर्यावरणाचा व्यापक दृष्टिकोन राखतो आणि ईव्ही१०० परिसंस्थेचा एक भाग म्हणून अत्यंत दूरदृष्टी असणाऱ्या जागतिक विचारधारेतून बरेच काही शिकण्याची संधीही यामुळे आम्हाला मिळते. आमची व्याप्ती आणि आवाका, तसेच शाश्वततेवर असलेला आमचा भर यामुळे आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या अमलबजावणीला वेग देण्यात लक्षणीय भूमिका पार पाडण्याबरोबरच या परिसंस्थेतील महत्त्वाच्या भागधारकांच्या साथीने काम करून स्वच्छ दळणवळणाला आम्ही मुख्य प्रवाहात आणू शकू, असा आमचा विश्वास आहे.”

क्लायमेट ग्रुपच्या इंडिया एग्झिक्युटिव डायरेक्टर दिव्या शर्मा म्हणाल्या, “फ्लिपकार्टने ईव्ही१०० मध्ये सहभागी होणे आणि भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे ही क्लायमेट ग्रुपसाठी आनंदाची आणि उत्साहाची बाब आहे. तंत्रज्ञानातील नाविन्याला चालना देण्यात आणि आमच्या जागतिक संपर्कजाळ्यातील व्यवसायांमध्ये ई-मोबिलिटी संदर्भात ज्ञान आणि माहितीच्या देवाणघेवाणीत फ्लिपकार्ट लक्षणीय भूमिका बजावेल. उत्सर्जनाची पातळी कमी करणे आणि दीर्घकाळासाठी हवेचा दर्जा सुधारण्यात साह्य करण्यासाठी अधिकाधिक भारतीय कंपन्यांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. ईव्हीचा व्यापक आणि वेगवान वापर व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या धोरणकर्त्यांना यातून मोठा पाठिंबा मिळणार आहे.”

जागतिक पातळीवरील ख्यातनाम ईव्ही१०० उपक्रमात सहभागी होणारी भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी म्हणून फ्लिपकार्ट भारतात इलेक्ट्रिक व्हिइकल्सच्या वापरात कॉर्पोरेट नेतृत्वाला उत्तेजन देण्याच्या ईव्ही१०० च्या उद्देशाला लक्षणीय स्वरुपात हातभार लावेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्हीज) वापराला चालना देण्यास बांधिल जगभरातील ७० हून अधिक कंपन्यांकडून बरेच काही जाणून घेण्याची, शिकण्याची ही संधी आहे.

आपला व्यवसाय आणि मूल्य साखळीत शाश्वत पद्धतींना चालना देण्यास फ्लिपकार्ट बांधिल आहे. शाश्वत प्रगतीच्या आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी या कंपनीने अनेक उपक्रम राबवले आहेत. आपल्या वितरण साखळीत एकदाच वापराच्या प्लास्टिक पॅकेजिंगचा वापर कमी करण्यास फ्लिपकार्ट बांधिल आहे आणि प्लास्टिक पॅकेजिंगच्या वापरात ५१ टक्के घट करण्यात त्यांना यश आले आहे. या क्षेत्रात ईपीआर ऑथरायझेशन मिळवणारी आमची पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे. त्यामुळे, आम्ही वापरलेले सगळे पॅकेजिंग आम्ही परत मिळवतो. आपल्या ऊर्जा वापरासाठी शाश्वत ऊर्जेचा वाढता वापर आणि एकूण वीज निर्मिती वाढवण्यासाठी नवीन प्रकल्प राबवणे तसेच आपल्या गोदामांमध्ये शून्य सांडपाणी अशा उपाययोजनांमधून फ्लिपकार्ट आपल्या कार्यचलनातही स्रोतांच्या परिणामकारकतेवर भर देत आहे. त्यांच्या धोरणात्मक सुविधांना ISO 14001 प्रमाणन मिळाले आहे. कामाच्या ठिकाणी पर्यावरणीय प्रदूषण रोखण्याच्या सज्जतेचे हे प्रमुख मापदंड आहे. हैदराबादमधील फ्लिपकार्टच्या डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर शाश्वत ऊर्जा वापरली जाते आणि त्यांची बहुतेक मोठी गोदामे आयजीबीसीच्या ग्रीन बिल्डिंग नियमांनुसार उभारण्यात आली आहेत.