ford

भारतातील फोर्ड कंपनीचे दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय(Ford Motor To Cease Production In India) कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. तसेच इतक्यात नवं मॉडेलदेखील कंपनीने बाजारात आणलेले नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण पुढे केलं जात आहे.

    अमेरिकन कंपनी फोर्ड मोटर(Ford Motor) भारतातील आपला गाशा गुंडाळणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील फोर्ड कंपनीचे दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय(Ford Motor To Cease Production In India) कंपनीने घेतला आहे. भारतात गेल्या काही दिवसात फोर्ड कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत घट झाली आहे. तसेच इतक्यात नवं मॉडेलदेखील कंपनीने बाजारात आणलेले नाही. त्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचं कारण पुढे केलं जात आहे. कारखाने(Ford Motor Company Factory In Loss) बंद करण्यासाठी जवळपास एका वर्षाचा कालावधी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार आहे.

    फोर्ड कंपनीचे साणंद आणि मराईमलाई येथे कारखाने आहेत. दरम्यान देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे देशात गाड्या विकणार आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्याासाठी डीलर्संना मदत होणार आहे.

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फोर्डच्या वाहनांच्या विक्रीत ६८.१ टक्क्यांची घट दिसून येत आहे. याशिवाय पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअरदेखील ०.६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ टक्के इतका होता.