उत्सव कालावधीच्या आधी होंडा कार्स इंडिया आणणार नवीन होंडा अमेझ

नवीन अमेझच्या एक्सटेरियर बदलांमध्ये फाईन क्रोम मोल्डिंग लाईन्ससह गोंडस सॉलिड विंग फेस फ्रंट ग्रीलचा समावेश आहे जो बळकट आणि प्रतिष्ठित प्रभाव देतो, इंटिग्रेटेड सिग्नेचर DRLs सह अत्याधुनिक आणि स्टायलिश एलइडी प्रोजेक्टर हेडलँप्स, मोठ्या दिसण्यासाठी स्लीक क्रोम गार्निशसह नवीन अत्याधुनिक एलइडी फ्रंट फॉग लँप्स आणि रिडिझाईन फ्रंट बंपर लोवर ग्रील. फ्रंट फॉग लॅम्पसह नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प रात्रीच्या वेळी पेटल्यावर कारच्या समोरील भागाला एकसंध डिझाईन अपील देतात.

  • फाईन क्रोम मोल्डिंग लाईन्ससह गोंडस विंग फेस फ्रंट ग्रीलसह सुधारित एक्सटेरियर स्टाईल
  • इंटिग्रेटेड सिग्नेचर DRLs सह अत्याधुनिक एलइडी प्रोजेक्टर हेडलँप्स
  • नवीन प्रीमियम सी-आकाराचे एलइडी रियर कॉम्बीनेशन लँप्स
  • नवीन डायमंड कट टू-टोन अलॉय व्हील्स
  • सॅटिन सिल्व्हर ऍसेंटसह प्रीमियम सुधारित इंटिरियर्स
  • मेटेऑरोइड ग्रे मेटॅलिक या नवीन रंगाचा परिचय
  • सुधारित पार्किंग सोयीस्करपणासह नवीन मल्टी-वीव रियर कॅमेराची ओळख

नवी दिल्ली : भारतामधील अग्रेसर प्रीमियम कारची निर्मिती असलेल्या होंडा कार्स इंडिया लि. (HCIL), ने नुकतीच सुधारित लुक, प्रीमियम एक्सटेरियर स्टायलिंग आणि प्लश इंटेरियर यांसह नवीन अमेझची (Honda Amaze) सुरूवात केली. ‘शानदार’ नवीन अमेझ अभिमानाने जीवन जगण्याच्या भावनेला मूर्त रूप देते आणि तिच्या अत्याधुनिक अवतारामध्ये नवीन ॲटिट्युड आणि ताजा आत्मविश्वास दर्शवते. प्रीमियम फॅमिली सेदान (Sedan) पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये मॅन्युअल तसेच सीव्हीटी ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. मेटेऑरोइड ग्रे मेटॅलिक हा अगदी नवीन रंग रेंजमध्ये समाविष्ट झाला आहे जो समकालीन आणि प्रीमियम लुक वाढवतो.

होंडा कार्स इंडिया लि. चे अध्यक्ष आणि सीईओ गाकु नाकानिशी नवीन अमेझच्या सुरूवातीबद्दल बोलताना म्हणाले, “नवीन अमेझच्या सुरूवातीने आम्हाला फार आनंद दिला आहे जी भारतामधील आमची फारच यशस्वी मॉडेल आहे आणि देशातील 4.5 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांनी स्वीकारली आहे. आमच्या व्यवसायासाठीचे योजनात्मक मॉडेल, विशिष्ट पद्धतीने भारतीय ग्राहकांसाठी विकसित केलेली आणि आकर्षकरित्या भारतामध्ये तयार केलेली, अमेझ सध्या भारतामधील होंडासाठी सर्वात जास्त चालवली जाणारी कार आहे आणि देशातील उत्तम-विक्री होणाऱ्या सेदानमधील तिचे स्थान राखले आहे. नवीन अमेझचा तीच्या सुधारित लुक आणि स्टाईलसह आमच्या ग्राहकांना सेदानचा उत्कृष्ट अनुभव आणि आनंद देण्याचा उद्देश्य आहे.” “आम्ही उत्सव कालावधीच्या आधीच नवीन अमेझची सुरूवात करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, कारला आमच्या ग्राहकांकडून उत्साह प्राप्त होईल.”असे ते पुढे म्हणाले.

नवीन अमेझच्या एक्सटेरियर बदलांमध्ये फाईन क्रोम मोल्डिंग लाईन्ससह गोंडस सॉलिड विंग फेस फ्रंट ग्रीलचा समावेश आहे जो बळकट आणि प्रतिष्ठित प्रभाव देतो, इंटिग्रेटेड सिग्नेचर DRLs सह अत्याधुनिक आणि स्टायलिश एलइडी प्रोजेक्टर हेडलँप्स, मोठ्या दिसण्यासाठी स्लीक क्रोम गार्निशसह नवीन अत्याधुनिक एलइडी फ्रंट फॉग लँप्स आणि रिडिझाईन फ्रंट बंपर लोवर ग्रील. फ्रंट फॉग लॅम्पसह नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प रात्रीच्या वेळी पेटल्यावर कारच्या समोरील भागाला एकसंध डिझाईन अपील देतात.

युनिक सिग्नेचर रेड ल्युमिनसंस आणि प्रीमियम क्रोम गार्निश आणि रिफ्लेक्टरसह रिडिझाइन्ड रियर बंपर यांसह नवीन आणि निराळा प्रीमियम सी-आकाराचे एलइडी रियर कॉम्बीनेशन लँप्स नवीन अमेझच्या मागील भागाला स्टनिंग देखावा देतात. रिफ्रेश मॉडेलमध्ये न्यु डायमंड-कट टू-टोन मल्टी-स्पोक R15 अलॉय व्हील्स आणि टच सेंसर बेस स्मार्ट एंट्री सिस्टीमसह नवीन क्रोम हँडल्स सुद्धा आहे जे कारचे एकूण एक्सटेरियर अपील सुधारतात.

न्यु अमेझची केबिन त्याच्या नवीन आश्चर्यकारक इंटीरियरसह सुरेखता, विशेषता आणि लक्झरीचे प्रतिक आहे. नवीन अमेझ डॅशबोर्ड आणि डोअर ट्रीमवर सॅटिन सिल्व्हर ऑरनामेंटेशन सह प्लश इंटेरियर्स, स्टेरिंग व्हीलवर सॅटिन सिल्व्हर आणि क्रोम प्लेटेड एसी व्हेंट नॉब यांची उत्कृष्ट ऑफर देते ज्याने अर्गोनॉमिकली अरेंज केलेल्या कॉकपिटमध्ये प्रीमियम आणि उच्च कॉन्ट्रास्टचे फीलिंग मिळते. नवीन स्टिचींग पॅटर्नसह प्रीमियम सीट अपहोल्स्ट्री, मॅन्युअल ट्रान्समिशन शिफ्ट लिवरसाठी लेदर बूट आणि ट्रंक लिड लाइनिंग उच्च दर्जाचे टच-आणि फील सुधारतो. रूमी केबिन सह आरामदायी आणि प्रशस्त इंटेरियर विशेष करून अँपल लेगरूम, कॉन्टर्ड बकेट सीट, डोअर ट्रीम्सवर फॅब्रिक पॅड आणि नवीन फ्रंट मॅप लँप देण्यासाठी बनवण्यात आले आहे. यामध्ये उच्चस्तरीय फंक्शन असलेले फिचर्स आहेत जसेकी, वन-पुश स्टार्ट/स्टॉप बटन, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, F1 इंस्पायर्ड स्पोर्टी पॅडल शिफ्ट, आणि क्रुझ कंट्रोल.

होंडा अमेझ मॅन्युअल आणि सीव्हीटी (कंटिन्युअलस्ली व्हेरिएबल ट्रान्समीशन) प्रकारांमध्ये होंडाच्या प्रसिद्ध 1.2L i-VTEC पेट्रोल इंजिन आणि 1.5L i-DTEC डिझेल इंजिन दोन्हींने प्रस्तुत आहेत. आऊटपुट आणि कार्यक्षमता यांसाठी तिच्या अत्याधुनिक लो फ्रिक्शन तंत्रज्ञानासह पेट्रोल इंजिन MT आणि CVT दोन्हींमध्ये 90PS पॉवर @ 6000 rpm देते. डिझेल इंजिन वाढत्या रिफाइनमेंटसह जास्त पॉवर प्राप्त कऱण्यासाठी विकसीत करण्यात आले आहे आणि तो MT मध्ये 100ps ची अधिकतम पॉवर तसेच CVT व्हेरिएंटमध्ये 80ps@3600 rpm ची पॉवर देतो. पेट्रोल आणि डीझेल दोन्हींमध्ये CVT उपलब्धतेची सोय उत्तम ड्रायव्हींगचा अनुभव आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते. होंडाच्या डिझेल आणि CVT चे लिनीयर ॲक्सिलरेशनच्या उच्च टॉर्कचे एकत्रीकरण स्मूथ आणि प्रतिसादात्मक ॲक्सिलरेशन देतो.

नवीन अमेझच्या सौंदर्यशास्त्र आणि सोयीस्करपणामध्ये भर देते ती म्हणजे DIGIPAD 2.0-17.7 सेमी टचस्क्रिन अत्याधुनिक डिस्प्ले ऑडियो सिस्टीम जी ॲपल कारप्ले™, अँड्रॉईड ऑटो™, वेबलिंक च्या माध्यमातून अमर्याद आणि स्मार्ट कनेक्टिव्हीटीची सुविधा देते आणि व्हॉईस कमांड, मेसेज, हँड्सफ्री टेलिफोनसाठी ब्लूटूथ आणि ऑडियो स्ट्रीमिंग सपोर्ट आणि वायरलेस इन्फ्रारेड रिमोट यांसारखे अत्याधुनिक फंक्शन सुद्धा देते. याव्यतिरीक्त, रियर कॅमेरा डिस्प्ले आता नॉर्मल वीवसारखे मल्टी-व्हीव्ज देऊ शकते आणि टाईट स्पॉट्समध्ये सुधारित पार्किंग सोयीस्करपणासाठी वाइड वीव आणि टॉप-डाऊन वीव सुद्धा देऊ शकते.

नवीन अमेझमध्ये सुरक्षित संरक्षणासाठी आधुनिक फिचर्स आहेत आणि होंडाच्या ॲक्टीव आणि पॅसिव सेफ्टी तंत्रज्ञानाची रेंज आहे, जो प्रमाणित उपकरणे म्हणून सर्व व्हेरिएंटमध्ये ऑफर देतो. होंडाची स्वतःची ACE बॉडी रचना, ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजरसाठी प्रमाणित ड्वेल SRS एयरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन (EBD) सह प्रमाणित अँटी-लॉक ब्रेक सिस्टीम (ABS), प्रमाणित ISOFIX सीट, ECU इमोबिलायजर सिस्टीम, मार्गदर्शक तत्वांसह नवीन रियर मल्टी-वीव कॅमेरा, लाईट सेंसरसह नवीन ऑटोमेटिक हेडलाईट कंट्रोल, पिंच गार्डसह ड्रायव्हर साईड विंडो वन टच अप/डाऊन, रियर पार्किंग सेंसर, परिणाम कमी करणारा फ्रंट हेड रेस्ट आणि पादचाऱ्यांना दुखापत कमी करण्याचे तंत्रज्ञान ही सर्व वैशिष्ट्ये त्यामध्ये आहेत.

होंडा अमेझ पेट्रोल आणि डिझेल व्हॅरिएंटमध्ये 3 ग्रेड मध्ये उपलब्ध आहे – E अपरिवर्तित ठेवली आहे, आणि नवीन S आणि नवीन VX मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे. याव्यतिरीक्त, CVT ही पेट्रोल मध्ये S आणि VX ग्रेड तसेच डिझेलमध्ये VX ग्रेडमध्ये उपलब्ध आहे. नवीन अमेझ 5 एक्सटेरियर रंगांच्या निवडीमध्ये उपलब्ध आहे – मेटेऑरोइड ग्रेड (नवीन परिचय), रेडिएंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, लुनार सिल्व्हर मेटॅलिक आणि गोल्डन ब्राऊन मेटॅलिक.

नवीन होंडा अमेझ ग्राहकांना 3 वर्षाची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी प्रमाणित लाभ म्हणून देऊन मनाची पूर्ण शांती देते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना मनाच्या आणखी शांतीसाठी दोन वर्षाची अतिरीक्त अमर्याद किलोमीटरसाठी विस्तारीत वॉरंटी मिळते आणि क्षेत्रात सर्वोत्तम अशी कोणत्याही वेळी 10 वर्षाची वॉरंटी मिळते. ही कार 1वर्ष/10,000 किमी पैकी जे लवकर असेल त्याच्या सर्व्हिस इंटर्वल सह देखभालीची कमी किंमतची सुविधा देते.

HCIL नवीन अमेझची डिलीव्हरी HCIL च्या देशभरातील डीलर नेटवर्कमधून सुरूवात झाल्यानंतर तात्काळ चालू करेल. ग्राहक होंडाच्या ऑनलाईन सेल्स प्लॅटफॉर्मवर ‘होंडा फ्रॉम होम’ मधून त्यांच्या घरीच आरामात बसून नवीन अमेझ खरेदी करू शकतात आणि बूक करू शकतात.

होंडा अमेझच्या पूर्ण रेंजसाठी किंमती (दिल्लीच्या शोरूम बाहेरील)

होंडा अमेझ बद्दल

पहिल्या होंडा अमेझची सुरूवात एप्रिल 2013 मध्ये झाली होती त्यानंतर दुसरी जनरेशन मे 2018 मध्ये सुरू झाली. अमेझ ही भारतामधील फारच यशस्वी मॉडेल ठरली आणि तिने टायर 2 आणि 3 मार्केटमध्ये समकालिन सेदान प्रकारांमध्ये मोठेच अस्तित्व आणि प्रसिद्धी मिळवली असून या शहरांमधून 68% मॉडेल विक्री झाले आहेत. ग्राहकांमध्ये ऑटोमेटिक ट्रान्समिशन मॉडेल्सच्या वाढत्या प्रसिद्धीसह, अमेझ मधील ऑटोमेटिक्सचा वाटा 20% पेक्षा जास्त आहे. होंडाच्या लाइन-अप मधील एंट्री मॉडेल होण्याच्या त्याच्या भूमिकेसाठी खरे ठरत, सुमारे 40% ग्राहकांनी अमेझची मोठ्या सेदानपैकी पहिली कार म्हणून निवड केलेली आहे आणि टिकाऊपणा, दर्जा, विश्वसनियता आणि देखभालीची कमी किंमत यांमुळे होंडा त्यांच्या मनाला मोठीच शांती देते.