येते आहे होंडाची दमदार स्कूटर, जाणून घ्या डिटेल्स

होंडाची (Honda) सर्वात मोठी आणि दमदार स्कूटर येते आहे. वीन टीझर व्हिडिओत फोर्जो रेंजच्या नवीन मॅक्सी स्कूटर Forza 750 चे अनेक डिटेल्स समोर आले आहेत. या स्कूटरमध्ये फुल्ली डिजीटल आणि कलर्ड इन्स्ट्रूमेंट सिस्टम असणार आहे.

नवी दिल्ली : होंडाची (Honda) सर्वात मोठी आणि दमदार स्कूटर येत आहे. होंडाने आपल्या या नवीन स्कूटर Forza 750 चे नवीन टीझर व्हिडिओ रिलीज केले आहेत. नवीन टीझर व्हिडिओत फोर्जो रेंजच्या नवीन मॅक्सी स्कूटर Forza 750 चे अनेक डिटेल्स समोर आले आहे. टीझर व्हिडिओवरून माहिती मिळते आहे की, नवीन मॅक्सी स्कूटरमध्ये (Maxi Scooter) इंजिन पुश टू स्टार्ट, स्टॉप बटन असणार आहे. तसेच स्कूटरमध्ये फुल्ली डिजीटल आणि कलर्ड इन्स्ट्रूमेंट सिस्टम असणार आहे. जे स्पीडोमीटर, ट्रिप मीटर, एवरेज फ्यूल कंज्प्शन, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि क्लॉक यासारख्या इंन्फर्मेशनला शो करणार आहे.

नवीन होंडा फोर्जा 750 स्कूटरमध्ये टू व्हीलरचे इन्स्टूमेंट क्लस्टर सोबत स्मार्टफोन्स पेअर करण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिविटी उपलब्ध करण्यात येईल. होंडाच्या या नवीन स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेविगेशन, कॉल आणि म्युझिक मॅनेजमेंट यासारखे फीचर्स असणार आहेत. स्कूटरमध्ये डेडिकेटेड मोबाइल ॲप्लिकेशन देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्व्हिस इंटरवल, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर रिडिंग यासारखे डेटा शो करणार आहे. होंडाची आता नवीन फोर्जो ७५० स्कूटरच्या इंजिनच्या डिटेल्सची घोषणा करणार आहे.

वेगवेगळ्या रायडिंग मोड्स सोबत येणार स्कूटर

टीझर व्हिडिओवरून माहिती मिळते आहे की, मॅक्सी स्कूटरमध्ये वेगवेगळे रायडिंग मोड्स असणार आहेत. यात LED DRL आणि स्टायलिश LED टेललँप सोबत ट्विन LED हेडलँप सह फुल LED लाइटिंग दिली आहे. स्कूटरची स्टायलिंग एकूणच स्पोर्टी असणार आहे. दुसऱ्या फोर्जा मॉडल्सशी मिळती जुळती असणार आहे. नवीन होंडा फोर्जा ७५० स्कूटर १४ ऑक्टोबरमध्ये दाखल होणार आहे त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय बाजारात येणार आहे.