Hyundai's flying taxi

फ्लाइंग टॅक्सी विकसित करण्याबाबतची आमची तयारी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा पुढे आहे, अशी माहिती ह्युंदाईचे ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, जोस मुनोज यांनी दिली. 'कार ऑफ फ्यूचर' अर्थात भविष्यातील कार कॉन्फरन्समध्ये झालेल्या मुलाखतीत बोलत होते. अमेरिकेच्या विमानतळांवर 2028 पर्यंत आमच्या हवाई टॅक्सी सुरू होतील असे जोस मुनोज यांनी यापूर्वी सांगितले होते. पण सोमवारी त्यांनी हवाई टॅक्सी सेवा 2025 च्या आधीच सुरू होऊ शकते असे म्हटले.

    जर तुम्हालाही असे वाटत असेल की फ्लाइंग टॅक्सी अर्थात उडणारी टॅक्सी अजून फक्त विचारांतच आहे आणि ते फक्त भविष्यातील स्वप्न आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण अनेक कंपन्या सध्या फ्लाइंग टॅक्सी विकसित करण्यावर काम करत आहेत, तर काही कंपन्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्या आहेत. ह्युंडाई मोटर्स आणि जनरल मोटर्स यांसारख्या आघाडीच्या कार कंपन्याही फ्लाइंग टॅक्सी विकसित करण्याबाबत गंभीर आहेत. ह्युंडाई कंपनी तर येत्या चार वर्षांमध्ये अर्थात 2025 मध्ये आपली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत आशावादी आहे.

    फ्लाइंग टॅक्सी विकसित करण्याबाबतची आमची तयारी ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा पुढे आहे, अशी माहिती ह्युंदाईचे ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, जोस मुनोज यांनी दिली. ‘कार ऑफ फ्यूचर’ अर्थात भविष्यातील कार कॉन्फरन्समध्ये झालेल्या मुलाखतीत बोलत होते. अमेरिकेच्या विमानतळांवर 2028 पर्यंत आमच्या हवाई टॅक्सी सुरू होतील असे जोस मुनोज यांनी यापूर्वी सांगितले होते. पण सोमवारी त्यांनी हवाई टॅक्सी सेवा 2025 च्या आधीच सुरू होऊ शकते असे म्हटले.

    ह्युंदाई एक इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी एअर टॅक्सी विकसित करीत आहे, या टॅक्सीतून पाच ते सहा जणांना प्रवास करता येईल. ह्युंडाईकडे ‘नासा’चे माजी अभियंता जैवान शिन यांच्या नेतृत्वात अर्पित एअर मोबिलिटी विभाग आहे. शिवाय कोरियन कारमेकरने 2025 पर्यंत शहरी हवाई गतिशीलतेमध्ये सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. तर, दुसरीकडे जनरल मोटरनेही जानेवारीमध्ये आपली हवाई टॅक्सी अर्थात फ्लाइंग Cadillac ला सादर केले होते. पण ही हवाई टॅक्सी सेवा प्रत्यक्षात येण्यास आणखी नऊ वर्षे लागतील असे कंपनीने सांगितले.

    हे सुद्धा वाचा